फुत्कारू लागले!

    15-Mar-2023
Total Views |
editorial on controvicial statement of abu azmi, Jaleel and Owaisi


आपल्या एकगठ्ठा मतांसाठी ते या हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचविण्याच्या उद्योगांच्या मागे लागले आहेत. स्वत:ला ‘मुसलमानांचे नेते’ म्हणविणारे नेते हे असेच वागणार, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कारण, पाकिस्तानचे राजकारणच मुळी भारतद्वेषावर चालते. तसेच ओवेसी, जलील, अबू आझमी यांचे राजकारण आपल्यातल्या धर्मांधांना अजून धर्मांध करून चालते.

'बुडाला औरंग्या पापी’ असे समर्थांनी वर्णन करून ठेवले असले आणि पुढे ‘आनंदवनभुवनी’ असे म्हटले असले तरी औरंगजेबाचे अनौरस वंशज औरंगजेबाच्या नावाला धक्का लागायला लागला की त्यांच्या जातीयवादी बिळांमधून कसे बाहेर येऊन फुत्कारायला लागतात, त्याची प्रचिती आता महाराष्ट्रात येत आहे. महाविकास आघाडीच्या काळात या उंदरांचे जे काही लांगूलचालन झाले, त्याचाच हा परिणाम मानायला हवा. औरंगाबादचे नामांतरण व्हावे, ही हिंदुत्व मानणार्‍यांची प्रदीर्घ मागणी होती. आपल्याला कधीच मिळणार्‍या मतांची चिंता न करता फडणवीस-शिंदे सरकारने हा निर्णय घेतला आणि कुणाच्या दाढ्या ओढल्या जाऊन कुणाचे काय दुखेल, याची पर्वा न करता नामांतरणाचा प्रस्ताव रेटून नेला. संभाजीनगरच्या नामांतरणात या ना त्या प्रकारे खोडा घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी काय काय तर्कट लढवले. म्हणे, संभाजी महाराजांचा औरंगाबादशी संबंध काय? मुळात ती हिंदूंचीच राजधानी. सर्वांत सामर्थ्यशाली आणि सुसंपन्न अशा यादव कुळाने देवगिरी वसविली.

लूटमार करायला आलेल्या अल्लाउद्दीन खिल्जीने सर्वांत आधी तिथे हिंदूंचा मानभंग केला आणि त्याची शेवटी कडी औरंगजेबाने केली. मात्र, ही शेवटची कडी त्याचीच ठरली. कारण, छत्रपतींच्या हिंदू साम्राज्याच्या स्वप्नाने औरंगजेबाचा बळी घेतला. मुघलांना लागलेला हा धक्का इतका मोठा होता की, मुघलांच्या इस्लामी राजवटीला उतरती कळा लागली ती कायमचीच! यानंतरचा सगळा काळ हा मराठा साम्राज्याचा होता. औरंगजेब मृत्युमुखी पडल्यानंतर खरंतर त्यावेळी इथे आलेले मुसलमान असतील तरी किती? मात्र, आज जे काही औरंगजेबाच्या नावाने उर बडवत आहेत, ते कोणाचे वंशज आहेत? आजच्या घडीला औरंगाबादची निम्मी लोकसंख्या इस्लामिक आहे. सय्यद इम्तियाज जलील हे संभाजीनगरचे खासदार आपण निवडून एका ठरावीक मतांच्या आधारावर आलो असलो तरी आपण आपल्या संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, याचे भान त्यांना नाही. आपल्या एकगठ्ठा मतांसाठी ते या हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचविण्याच्या उद्योगांच्या मागे लागले आहेत. स्वत:ला ‘मुसलमानांचे नेते’ म्हणविणारे नेते हे असेच वागणार, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कारण, पाकिस्तानाचे राजकारणच मुळी भारतद्वेषावर चालते. तसेच ओवेसी, जलील, अबू आझमी यांचे राजकारण आपल्यातल्या धर्मांधांना अजून धर्मांध करून चालते. यात काही तथाकथित सेक्युलरही आहेत, ज्यांना निवडून येण्यासाठी या धर्मांधांचा टेकू लागतो. ही सगळी मंडळी इतकी वर्ष सर्वधर्मसमभावावर ज्या गोष्टी करीत आहेत, त्याला चाप लावण्याची आता वेळ आली आहे.यापैकी काही मंडळी एकीकडे सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी झाडून अक्कल पाजळतात, तर दुसरीकडे काही मुल्ला-मौलवींना पुन्हा इस्लामिक राष्ट्राची दिवास्वप्नं पडू लागली आहेत.


‘इत्तेहाद मिल्लत काऊंसिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा हे मौलानाही त्यापैकीच एक. मुसलमानांना हिंदूंविरोधात उकसवण्याची भाषा करायची आणि त्यांना अधिकाधिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ‘जिहाद’च्या खोल दरीत ढकलायचेच उद्योग या मौलानांनी वर्षानुवर्षे केले. नुकतेच त्यांनी हिंदूराष्ट्राला विरोेध करत खलिस्तानचेही चक्क समर्थन केले. म्हणजे राहायचे, खायचे भारतभूमीत, पण याच भारताचे तुकडे पाडू इच्छिणार्‍या राष्ट्रद्रोही शक्तींना पाठिंबा द्यायचा, अशी ही त्यांची जुनीच खोड. पण, खलिस्तान समर्थनाने समाधान झाले नाही म्हटल्यावर पुन्हा एकदा या मौलानांनी मुस्लीम राष्ट्राची हाक दिली. म्हणजे आता फाळणीच्या ७५ वर्षांनंतरही या अल्पसंख्याक म्हणवून घेणार्‍यांना पुन्हा एकदा नवीन मुस्लीम राष्ट्राचे डोहाळे का पडू लागले? त्याचे कारणही तसेच. कारण, आधी मुस्लीम राष्ट्राच्या नावावर ज्या पाकिस्तानची निर्मिती केली, आज तोच पाकिस्तान भिकेकंगाल झाला आहे. एवढेच नाही, तर हा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून आज त्याचे तुकडे पडतील की उद्या, अशी भयंकर अवस्था. पाकिस्तानी जनतेला दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडलेली. त्यामुळे पाकिस्तान हा चीनच्या कर्जावर आणि अमेरिकेच्या मर्जीवर पोसला जाणारा एक परावलंबी आणि सपशेल अयशस्वी ठरलेला देश. पण, मौलानांना तो दिसणारही नाही किंवा तिथे बघण्याची त्यांची इच्छाच होत नाही. ‘पाकिस्तानी मुस्लीम वेगळे आणि आम्ही मुसलमान वेगळे’ म्हणून काही जण अजब तर्क लढवून हातही वर करतात. पण, एवढाच मुस्लीम राष्ट्राचा पुळका असेल, तर या मौलानांनी पाकिस्तानात जाऊन तिथली परिस्थिती आपल्या डोळ्यांनी एकदा नीट बघूनच यावी.

‘पाक’ म्हणवल्या जाणार्‍या या देशात आता काय ‘पाक’ उरले आहे, तेही कुठे मिळतेय ते शोधावे. मुस्लीम राष्ट्र म्हणून धर्माच्या आधारावर फाळणी झालेला पाकिस्तान आज कुठे आणि सर्वधर्मसमभाव खरोखरीच मानणारा भारत कुठे, हे या मौलानांनी जरा डोळे तपासून पाहावे आणि तरीही काही दिसतच नसेल, धर्मांधळेपणाने इतके ग्रासले असेल, तर कायमची बुडत्या पाकिस्तानची वाट धरावी. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती हीच मुळी तत्कालीन राज्यकर्त्यांच्या अधोरणीपणाचा परिपाक होता. पण, आता आणखी एक पाकिस्तान, खलिस्तान असा भारताच्या भूमीचा एक इंचही तुकडा पडणे नाही. कारण, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारत हा तुटणारा नाही, तर जोडणारा आहे. पण, कुणी भारताच्या एकतेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना प्रसंगी धडा शिकवणारा आजचा हा नवभारत आहे. त्यामुळे रझासारखे मौलाना आणि आजही मुस्लीम राष्ट्राचे हिरवे स्वप्न पाहणार्‍यांनी या भ्रमातून बाहेर पडावे, असे फुटकळ दावे आणि धमक्या देऊन मुस्लीम तरुणांची माथी भडकावण्याचे उद्योग बंद करावे. कारण, त्यामुळे त्यांच्या हाती काहीही लागणार नाही.

खरंतर रझांसारखे मौलाना जेव्हा असे राष्ट्रविरोधी दावे करतात, तेव्हा मुस्लीम समाजातील तथाकथित विचारवंत नेमके कुठल्या बिळात लपून बसतात, हाच संशोधनाचा विषय ठरावा. कराचीत जाऊन पाकिस्तानला दोन शब्द सुनावणारे जावेदमियाँ आपल्याच देशातील अशा विखारी मौलानांच्या विचारांना खोडून काढण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत? की त्यांनाही या मौलानांप्रमाणे मुस्लीम राष्ट्राचा स्वप्नदोष जडला आहे? त्यामुळे मुस्लीम समाजाचे, महिलांचे, युवकांचे प्रश्न गंभीर आहेत. ते समजून समाज म्हणून त्यांना पाठबळ देणे, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज म्हणावी लागेल. पण, अशा मुस्लीम समाजहितैषी गोष्टी करण्यापेक्षा पुन्हा मुसलमानांना या जन्मातच असंभव असलेल्या नवीन मुस्लीम राष्ट्राची स्वप्नपेरणी करुन काय हासिल होणार?योगींच्या उत्तर प्रदेशात गायीची मान मुरडण्याची स्टंटबाजी करणार्‍या तरुणाला पोलिसांनी नुकताच चोप देऊन चांगलीच अद्दल घडविली, असे वर्तन करून हिंदूंचा, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा, प्रतीकांचा अपमान करणार्‍यांना असाच आयुष्यभर लक्षात राहील, असा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. तसेच, या तरुणांच्या मनात पुन्हा नवीन मुस्लीम राष्ट्र, ‘गझवा-ए-हिंद’ची विषपेरणी करणार्‍या मौलानांचीही जुन्याच आणि कदाचित इतिहासजमा होईल, त्या पाकिस्तानातच रवानगी करणे उचित ठरावे!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.