मुंबई : कोरोनाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आलेला असताना ओसरताच इन्फ्लुएंझा एच३एन२ या विषाणूचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांत दहशत वाढत आहे. या विषाणुची लागण झाल्यामुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाला असून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
सद्या तापाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ताप अंगावर न काढण्याची सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. १२ मार्चच्या आकडेवारीनूसार एच३एन२ची लागण झालेले ३५२ रुग्णांची राज्यभरात नोंद झाली आहे.एच३एन२ची बाधा झालेल्या व्यक्तीवर वेळीच उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे कुणीही ताप अंगावर काढू नये, असे आवाहनही आरोग्यमंत्री सावंत यांनी केले आहे. राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले.
एच३एन२ आजाराचा रुग्ण असेल तर त्याच्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश सर्व रुग्णालयांना देण्यात आले आहे. नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.(तानाजी सावंत, आरोग्यमंत्री)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.