'प्रकर्ष 'आयोजित एमएसएमई आणि वुमन इंटरपप्रेनर कांक्लेव कार्यक्रम पुणे येथे सपन्न

    10-Mar-2023
Total Views | 2
 

'प्रकर्ष 'आयोजित एमएसएमई आणि वुमन इंटरपप्रेनर कांक्लेव चे सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथील छत्रपति शिवाजी महाराज सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंजना गोस्वामी यांना जीवनगौरव पुरस्कार डॉ. योगेश दुबे चेअरमन भारतीय विकास संस्था  आणि डॉ. शालीग्राम सीईओ एसपिपियु आरपिएफ याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी  सुचित्रा चाटर्जी, प्रो. वी. एस. सोनावने, संजू उन्नी, डॉ. संजय गांधी, वासंति मुलुंजकर आणि नीलम खंडाळे यावेळी उपस्थित होते.

उद्योग वड़वायचा असेल तर विजन असावे लागते दूरदृष्टि  असावी लागते महाभारता मधे जर श्रीकृष्ण नसता तर धर्मयुद्ध पांडव कसे जिंकू शकले असते. प्रत्येक व्यक्तिला जीवनात  मार्ग दाखवणारा एक गुरु असावा लागतो. जो आपणास मार्ग दाखवतो याच प्रमाणे आज कार्यक्रमा मधे नविन उद्योग जर भविष्य काळात पुढे नेहयासाठी आज च्या प्रमाणे कार्यक्रम होने गरजे आहे. हे यावेळी दिलीप अवटी म्हणाले.

एक दिवसीय कार्यशाले मधे अलेल्या 150 इंटरपप्रेनर याना मोटिवेशन करण्यासाठी चार स्पीकर बोलावण्यात आले होते. यावेळी चर्चा सत्रचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रा साठी दीपक शिकारपुरकर किनेटिक कम्युनिकेशन लिमिटेड, वेणु साबले को फाउंडर ऑफ औदुटेक कंपनी, पड़ेगा भारत झेलम चुबेल डायरेक्टर केसरी टूर्स एंड ट्रैवल्स प्रज्ञा गोडबोले सीईओ देसरा फाउंडेशन यांनी चर्चासत्रा मधे भाग घेतला.

एमएसएमई आणि वुमन इंटरपप्रेनर कांक्लेव चे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड अंजना गोस्वामी संचालिका, इंटरनॅशनल वुमन नेटवर्किंग ऑर्गनायझेशन, यांना   देण्यात आला यावेळी ( डाविकडून)  डॉ. संजय गांधी संस्थापक, अस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडिया  डॉ. अरविंद शाळीग्राम, सीईओ, एसपीपीयू-आरपीएफ
 अंजना गोस्वामी, 
 कर्नल. संजय गोस्वामी (निवृत्त)
सुचित्रा चॅटर्जी, संस्थापक IWNO आणि आयोजन समिती ' प्रकर्ष ' यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुचित्रा चाटर्जी यांनी केले कार्यक्रमाची माहिती डॉ. शालीग्राम यांनी दिली महेश पवार यांनी अलेल्या पाहुण्याचे तसेच कार्यक्रमासाठी ज्यानी साहकार्य केले यांचे आभार मानले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121