मुंबई : साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त झालेले सुप्रसिद्ध बालसाहित्यकार लेखक आणि कवी एकनाथ आव्हाड यांची जाहीर मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. गुरुवार दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूल, सुभाषनगर येथे हि मुलाखत होणार आहे. 'बालकवी आपल्या भेटीला' ही मुलाखत क्रांती गोडबोले - पाटील घेणार आहेत. बालसाहित्य, त्याची निकड, लहान मुलांचे साहित्यविषव तसेच त्यांचा प्रतिसाद अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा होईल.