मध्यप्रदेशात I.N.D.I. आघाडीचा सामना NOTAशी! आपचं डिपॉझिट जप्त, जदयु सपाही सपाट

    05-Dec-2023
Total Views | 42

jdu sp
 
नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने विजयी झाला, तर तेलंगणा काँग्रेसकडे गेला आणि मिझोराममध्ये नवीन पक्ष झेडपीएम सत्तेवर आला. ज्या राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली तेथे थेट काँग्रेसशीच स्पर्धा होती. आम आदमी पार्टी (आप), जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि समाजवादी पार्टी (एसपी) यांनीही या राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, या सर्वच पक्षांच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यासाठीही संघर्ष करावा लागला आहे. अनेकांनातर नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
 
मध्यप्रदेशात जेडीयु ने एकूण 9 जागांवर निवडणूक लढवली. यातील एकाही जागांवर उमेदवाराला आपले डिपॉझिट सुद्धा वाचवता आले नाहीये. यातील चार जागांवर तर जेडीयु च्या उमेदवारांस २०० पेक्षाही कमी मते मिळाली. जेडीयु ला मिळालेल्या मतांची टक्केवारी एकूण मतांच्या ०.०२ टक्के एवढं आहे. यापूर्वी फक्त २००३ मध्ये एकदाच जेडीयु चे उमेदवार सरोज बच्चन निवडून आले होते.
 
हे ही वाचा: भाजपने केला केसीआर यांचा पराभव; काँग्रेसच्या या बड्या नेत्यालाही हरवले
 
I.N.D.I. आघाडीच्या इतर घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशात एकूण ६९ जागांवर उमेदवार उभे केले होते. यातील एकही उमेदवार विजयाच्या जवळपास कुठेही दिसला नाही. सपाला मिळालेली एकूण मतांची टक्केवारी केवळ ०.४६ होती. ४३ जागांवर सपाच्या उमेदवारांना १ हजारांपेक्षा कमी मते मिळाली. अखिलेश यादव यांच्या आक्रमक सभांनंतरही एकाही जागेवर समाजवादी पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आला नाही. पराभूत उमेदवारांमध्ये बुधनी मतदारसंघातून 'मिर्ची बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध स्वामी वैरागानं देखील आहेत.
 
मध्य प्रदेशात आम आदमी पक्षाची (आप) अवस्था कमी-अधिक प्रमाणात जेडीयू आणि सपासारखीच होती. अरविंद केजरीवाल यांनी मध्य प्रदेशात एकूण ७० उमेदवार उभे केले होते. अंतिम निकाल आणि ट्रेंड एकत्र घेतल्यास, एकही विजयाच्या जवळपासही दिसला नाही. सर्व 70 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले. मध्य प्रदेशात आप पक्षाची एकूण मतांची टक्केवारी ०.४२ होती. पराभूत उमेदवारांमध्ये दमोह मतदारसंघातून टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे आणि सिंगरौलीच्या महापौर राणी अग्रवाल यांचा समावेश आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महारेराकडील नोंदणीकृत एजंटसची संख्या ५० हजारांवर

महारेराकडील नोंदणीकृत एजंटसची संख्या ५० हजारांवर

महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी नुकताच ५० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एजंटसच्या संख्येनेही महाराष्ट्रात ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात केवळ राज्यातील एजंटस आहेत असे नाही तर महाराष्ट्राचे त्यातही विशेषतः मुंबई महाप्रदेश आणि पुणे परिसराचे स्थावर संपदा क्षेत्रातील वेगळे स्थान लक्षात घेता देशाच्या बहुतेक राज्याच्या प्रमुख शहरातील एजंटसनी महारेराकडे नोंदणी केलेली आहे. यात नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, ..

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांचा ‘खालिद का शिवाजी’

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांचा ‘खालिद का शिवाजी’

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील प्रतिष्ठित ‘मार्शे दु फिल्म’ या विभागासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यातर्फे अधिकृत निवड झालेला हा चित्रपट नुकताच जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात झळकला आहे. मायकेल थेवर आणि सुषमा गणवीर निर्मित, राज प्रीतम मोरे दिग्दर्शित 'खालिद का शिवाजी' या चित्रपटात क्रिश मोरे याने खालिदची भूमिका साकारली असून सोबत प्रियदर्शन जाधव, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121