मुंबई : देशातील नगन्य समजल्या जाणाऱ्या अडणींना रुपेरी पडद्यावर मांडत प्रेक्षकांना मनोरंजनातून समाजाचा खरा आरसा दाखवण्याचे काम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांतून आजवर केले आहे. 'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी', 'द वॅक्सिन वॉर' असे चित्रपट प्रेक्षकांना देणारे विवेक अग्निहोत्री पौराणिक चित्रपटांकडे वळले आहेत. विवेक अग्निहोत्री 'महाभारता’वर आधारित चित्रपट करणार असून तीन भागांमध्ये प्रेक्षकांना हा पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी संस्कृत महाकाव्यावर चित्रपट तयार करणार असल्याचे जाहिर केले असून आपण या महाकाव्यावर आधारित असलेल्या चित्रपटाला प्रामाणिकपणे न्याय देणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत टाईम्स नाऊ सोबत विवेक अग्निहोत्री बातचीत करताना म्हणाले की, “माझ्याकडे जेव्हा महाभारतावर आधारित चित्रपट बनविण्याचा प्रस्ताव आला तेव्हा मी खूपच विचारात पडलो. मी माझ्या आय़ुष्याचा बराचसा काळ हा वाचनात, अभ्यासात आणि संशोधनात घालवला आहे. मात्र महाभारताच्या कथेबाबत माझा दृष्टिकोन वेगळा आहे” असे त्यांचे म्हणणे आहे.
पुढे ते असे देखील म्हणाले की, “मला जर या अशा प्रकारच्या इतिहासाला समोर आणायचं असेल तर मी ते करणार. बाकीची लोकं बॉक्स ऑफिसवर दुसरं काही तयार करत आहेत. अशावेळी मी काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेकांनी यापूर्वी अर्जुन, भीम यांचा महिमा कथन केला आहे. पण माझ्यासाठी महाभारत ही धर्म विरुद्ध अधर्माची लढाई आहे”, असे त्यांनी म्हटले होते.