मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता आर माधवन ८ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करणार आहेत. 'तन्नु वेड्स मन्नु' नंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली असून यावेळी ते सायकोथ्रिलर भेटीस घेऊन येणार आहेत.
कंगना राणावत हिने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा ट्विट करत केली आहे. "आज चेन्नईमध्ये आम्ही आमच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. याची आणखी माहिती आम्ही लवकरच देऊ. सध्या या अतिशय असामान्य आणि रोमांचक स्क्रिप्टसाठी तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे."
आठ वर्षानंतर आर माधवनसोबत शेअर करणार स्क्रिन
कंगना आणि आर माधवन यांनी २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘तन्नु वेड्स मन्नु रिटर्न्स’ या चित्रपटानंतर आता सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटामधून कंगना आणि आर माधवन हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय तिचा ‘तेजस’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपट २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर आर. माधवन याची ‘द रेल्वे मॅन’ ही भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब मालिका ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झाली आहे.