मुंबई : हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या स्मृतीस्थळावर शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेंकाना भिडले आहेत. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून निघाले.त्यानंतर शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्तेंमध्ये धक्काबुक्की झाली. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदीसह दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यास दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतक म्हात्रे यांनी केला.