मुंबई : निवडणुकीत हिंदूत्त्वाचा प्रचार केला म्हणून उबाठा गटप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, ज्याप्रमाणे बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढला तसा मोदी-शाहांचा अधिकार काढून घ्या. मात्र त्यांना ह्याची आठवण नव्हती की, त्यावेळी काँग्रेस सरकारच्या काळात बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार राष्ट्रपतींच्या सल्ल्याने निवडणुक आयोगाने काढला होता.
दरम्यान यावर पंतप्रधान मोंदींनी ही आधी काँग्रेसवर टीका केली होती. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काँग्रेसवाल्यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. मानवी हक्कांची भाषा तुम्हाला शोभत नाही. काँग्रेसनं हिंदुस्तानातल्या प्रत्येक मुलाला उत्तर दिलं पाहिजे, हिंदूस्तानातल्या प्रत्येक मुलाला न्याय दिला पाहिजे. तुम्ही काँग्रेसवाल्यांनी बाळासाहेबांचं नागरिकत्व काढून घेतलं होतं. त्यांचा मतदानाचा हक्क हिसकावून घेतला होता, अशी टीका मोंदींनी केली होती.
काय होते प्रकरण?
डिसेंबर १९८७ साली मुंबईतील विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक होती. त्यावेळी पोटनिवडणुकीत पराभूत झाल्याने काँग्रेस नेते प्रभाकर काशीनाथ कुंटे यांनी कोर्टात धाव घेतली. आणि बाळासाहेब ठाकरेंनी प्रक्षोभक भाषणं करून डॉ. रमेश प्रभू निवडणूक जिंकले, असा त्यांनी आरोप केला. त्यासंबंधित त्यांनी भाषणांचे पुरावेही कोर्टाच्या हवाली केले. आणि त्यानंतर उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं आणि नंतर राष्ट्रपतींनी निवडणुक आयोगाच्या मदतीने १९९५ ते २००१ पर्यत मतदानाचा अधिकार काढून घेतला.