भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वीच माजी क्रिकेटरच्या पत्रकार सूनेचा भारतावर आरोप

    15-Nov-2023
Total Views |
slow-track-spin-changing-pitch-switch-media-accusation

मुंबई :
एका प्रसिध्द पत्रकाराच्या सासऱ्याने न्यूझीलंडविरुद्ध १८ चौकार मारून शतक झळकावले होते, त्यांची पत्रकार सून भारतावर आरोप करत असून तिने म्हटले आहे की, उपांत्य फेरीसाठी भारताने खराब खेळपट्टी तयार केली आहे, असा गंभीर आरोप महिला पत्रकाराने केला आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी सागरिका घोष यांनी विश्चचषकातील भारताच्या कामगिरीवर शंका घेतली आहे.

दरम्यान, भारताने क्रिकेट विश्वचषक २०२३मधील साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत, त्यांनी सर्व सामने त्यांच्या आवडीनुसार खेळपट्टी बनवून जिंकले असून डाव्या विचारसरणीची माध्यमे आणि परदेशी गोरी कातडीची माध्यमे हेच म्हणत आहेत, असा दाखला पत्रकार राजदीप यांच्या पत्नी सागरिका घोष हिने या सामन्याच्या पार्श्वभूमीवर दिला. त्यांनी हा गंभीर आरोप करत भारतीय खेळपट्टींवर भाष्य केले आहे.

विशेष बाब म्हणजे 'इंडियन एक्स्प्रेस'ने 'सूत्रांच्या हवाल्याने' प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे की, वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी संथ खेळपट्टीची निवड करण्यात आल्याचे या अहवालात लिहिले आहे. यासाठी बीसीसीआयच्या क्युरेटरला (जो खेळपट्टी तयार करतो) खेळपट्टीवरील गवत काढण्यास सांगितले होते, असेही त्यात सांगण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.