मुंबई : न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे. त्याने सचिन तेंडूलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात नवा इतिहास रचत सर्वाधिक वनडे शतकवीराचा बहुमान पटकाविला आहे.
दरम्यान, विराट कोहलीने आजच्या न्यूझीलंडविरुध्दच्या उपांत्य फेरीत १०६ चेंडूत १ षटकारासह ९ चौकारांच्या मदतीने शानदार शतक झळकावत नवा कीर्तीमान आपल्या नावे केला आहे. तर विराटचे हे आतापर्यंतचे ५० वे शतक असून सचिन तेंडूलकरने वनडेत ४९ शतके झळकावली आहेत.