विराटने तोडला सचिनचा 'हा' रेकॉर्ड; जाणून घ्या

    15-Nov-2023
Total Views |
Virat Kohli New record Creates

मुंबई :
विराट कोहलीने उपांत्य सामन्यात नवा रेकॉर्ड केला असून एकदिवसीय विश्वचषकात चार सेमीफायनल खेळणारा विराट कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहलीने २०११ मध्ये वर्ल्ड कपमध्ये पहिला सेमीफायनल खेळला होता. टीम इंडियाने हा वर्ल्ड कपही जिंकला होता.

यानंतर २०१५ मध्ये विराटने ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरी खेळली होती. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात विराट कोहलीने उपांत्य फेरी गाठली होती आणि आता २०२३ मध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीला विश्वचषक उपांत्य फेरी खेळण्याचा मान मिळाला आहे.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडेच्या मैदानावर उपांत्य सामन्यात रणमशीन विराट कोहलीला मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात विराट कोहलीला ५० शतके पूर्ण करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या सामन्यात विराट कोहलीने शतकीय खेळी करून सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी केली होती.

दरम्यान, आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या सामन्यात विशेषतः वानखेडेवर विराटचा परफॉर्मन्स बेस्ट राहिला असून त्याच्याकडून आज मोठ्या खेळीची टीम इंडियाला अपेक्षा असणार आहे. तसेच, खुद्द सचिन तेंडूलकरने या नव्या विक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या होत्या. सचिनने यासंदर्भात X पोस्ट केली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.