मुंबई : भारत आणि न्यूझीलंड सामन्यात भारताला मोठा धक्का बसला असून सलामीवीर शुभमन गिल रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. गिलने भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने पावरप्लेमध्ये ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्या घातक गोलंदाजीला सडेतोड प्रत्युत्तर दिले. परंतु, गिल जरी आता मैदानाबाहेर असला तरी पुन्हा खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो.
दरम्यान, शुभमन गिलने ६५ चेंडूत ७९ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने ८ चौकारांसह ३ षटकार ठोकले आहेत. सध्या भारत १ बाद १९४ धावांसह सुस्थितीत आहे. याच रनरेटसह भारत ३५० धावांचा विशालकाय स्कोर किवींसमोर ठेवू शकतो. सध्या विराट कोहलीने अर्धशतक ठोकले असून श्रेयस अय्यर हे दोघे खेळत आहेत.