आजपासून भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरतीकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात

    01-Nov-2023
Total Views |
Work-Opportunity-in-Airports-Authority-of-India

मुंबई :
भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात एयरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया अंतर्गत लवकरच भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून दि. ०१ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्राफिक कंट्रोल) या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून अंतिम मुदत दि. ३० नोव्हेंबर २०२३ असणार आहे.

तसेच, या पदांच्या आवश्यकतेनुसार, उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार असून अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. या भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121