स्वानंदी जीवनाची गुरुकिल्ली

    19-Sep-2022
Total Views |

hl
 
 
 
लोक सर्वसामान्यपणे भयंकर गोष्टींकडे लक्ष वेधून घेतात, हे आपल्या लक्षात घेण्याच्या आणि तणावावर प्रतिक्रिया देण्याच्या आपल्या क्षमतेचा भाग आहे. जगण्याचे तंत्र जरी आपण काळानुसार शिकलो, तरी जीवनातील भयंकर, धोक्याच्या आणि भीतिदायक गोष्टींची उत्तम जाणीव आपल्याला सदैव राहते. आपणदेखील सर्व प्रकारच्या भावना अनुभवतो आणि माणसांसाठी ते असेच असले पाहिजे. परंतु, कधीकधी दररोज घडणार्‍या सर्व भयंकर गोष्टींच्या अनुभवाने आपल्याला असे वाटू शकते की, जगात कोणताही प्रकाश शिल्लक नाही.
 
 
भयानक युद्धसदृश्य व दहशतवादी आणि दुःखद घटनांशी तुमचा संपर्क कमी करण्यासाठी बातम्यांवर काही ‘म्यूट’ बटन दाबणे महत्त्वाचे आहे. पण, तुमचे डोळे उघडा आणि तुमच्या रोजच्या जीवनातील अनुभवांचे छोटे-छोटे सुंदर तपशील पाहण्यासाठी अवतीभवती जरुर पाहा. जगात खूप काही अद्भुत आहे, सुंदर आहे आणि आपण ते लक्षात घेतले पाहिजे. जगाविषयी जागरुकता असणे आणि कुठे काय घडत आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण जागतिक समुदायाचा एक व्यस्त भाग होऊ शकतो.
 
 
तथापि, जीवनात भरभराट होण्यासाठी येथे लहान-लहान आणि काही विशिष्ट गोष्टी लक्षात घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. झोपेतून उठल्यावर पक्षी ज्या प्रकारे किलबिल करतात, झाडांवरून वाहणारा वारा कसा अंगाला स्पर्श करतो, रात्रीच्या वेळी तुमच्या अंथरुणाची ऊब तुम्हाला शांत झोप कशी देते, तुमच्या टेबलावरचे अन्न पाहून तुमची भूक कशी चाळवते, या गोष्टी सोप्या वाटतात, पण खरंतर त्या मनाला तजेला देतात. जीवन सुंदर आहे, याची वेळोवेळी आठवण करून देतात.
 
 
तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. आयुष्यात रमणारे असे विचार तुमचा विश्वास असलेल्या अनेक गोष्टींबाबत भूमिका घेण्यास आणि आपल्या जगात बदल करण्यास तुम्हाला मदत करतात. आयुष्यातील कठीण परिस्थितीतून आलेल्या आणि अशक्य वाटणार्‍या गोष्टींवर विजय मिळवणारे लोक आपण सगळ्या लोकांनी पाहिले आहेत. त्यांच्याकडे एक ध्येय आहे, इच्छा आहे आणि ते त्यामागे जातात. मग, हे तुमच्या नशिबी का असू शकत नाही?
 
 
जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल, जी तुमच्यासाठी चांगली नाही, तर तुम्ही तुमची परिस्थिती कशी बदलू शकता, याचा विचार करा. जर तुमची मोठी स्वप्ने असतील, तर ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कशा प्रकारची कृती योजना कशी बनवू शकता, याचा विचार करा. तुमचे नशीब तयार करणे म्हणजे तुमची प्रतिक्रिया, तुम्ही कसे विचार करता आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारा निर्णय तुम्ही कसा घेऊ शकता, याची निवड करणे. निसर्ग आपल्याला सदैव आठवण करून देत असतो की, या जगात काहीही शक्य आहे.
 
 
नेहमीच एक नवीन दिवस उगवत असतो, एक नवीन अनुभव येत असतो. अगदी काळी रात्रही संपते आणि सूर्य उगवतो. जर तुम्ही या क्षणी कठीण काळातून जात असाल, तर हे जाणून घ्या की, वेळ बदलत जातो, वेदना कधीतरी कमी होते आणि नेहमीच एक नवीन दिवस आणि नवा अनुभव आपल्या आयुष्यात येत असतो. एक स्मरणपत्र ठेवा की,जे जे तुम्ही तुमच्या विचारात गुंफत जाल, तर तुम्ही काहीही मिळवू शकता. जीवनात येणार्‍या अडचणी आपल्याला आकार देत असतात आणि जीवनातील पुढे येऊ घातलेल्या अद्भुत अनुभवांसाठी आपल्याला तयार करत असतात. अडचणी आणि वाईट अनुभव अयोग्य वाटतात (आणि ते आहेत), परंतु, आपण या परिस्थितींना कशाप्रकारे प्रतिसाद देतो, यावरून आपण नेहमीच शिकत जातो, जेणेकरून पुढच्या वेळी संघर्ष समोर असेल, तरी आपण त्यातून सहज बाहेर पडू शकतो.
 
 
कधी कधी संघर्ष आपल्याला सहानुभूतीशील, प्रेमळ प्राणी बनवू शकतो. ज्यामुळे आपण चांगले मित्र, प्रेमी, सहचारी बनू शकतो. आयुष्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. खरंतर हे संशोधनातून असे दिसून आले आहे की, एखाद्या दिवशी, जास्त संख्येने मिळालेले साधे-साधे आनंद, तुलनेने लहान-लहान वासाच्या अनुभवातील नकारात्मक परिणाम हळूहळू नष्ट करतात. फारच आश्चर्यकारक वाटते नाही का! यातून आपल्या लक्षात काय येते, तर साध्या-साध्या सुखांवर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला दररोज प्रसन्न व समाधानी वाटेल.
 
 
आपण सर्वांनीच जीवनात अनेक चुकीची वळणे घेतली आहेत, मग ती लहान असो वा मोठी, पण सुंदर गोष्ट म्हणजे - आपल्याला आपला विचार बदलायला हवा. तुम्हाला आवडत नसलेल्या नात्यात राहण्यासाठी, तुमची प्रगती खुंटणारी नोकरी किंवा तुम्हाला थकवणारे वेळापत्रक पाळावे, असे कोणतेही विचित्र नियम पाळायची गरज माणसाला नक्की नाही.आपण सगळे आपापल्या जगाचे स्वामी आहोत आणि तुम्हाला तुमचे हात बांधलेले वाटत असले किंवा तुम्ही इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असाल, तरीही तुम्ही गोष्टी शेवटी तुम्हाला पटतात म्हणून करता का नाही, याचा पुनर्विचार करण्याची तुमच्याकडे ताकद आहे.
 
 
तुम्ही गोष्टी कधी करायच्या याची ‘टाईमलाईन’ नाही. जेव्हा तुमची तयारी असेल तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकता. पण, लक्षात ठेवा, सुरू करण्यासाठी जरी तुमचे स्वप्न, उद्दिष्टे किंवा योजना आता तुमच्या जीवनात योग्यरित्या बसत नसल्या, तरी - तुम्ही थोडीशी सुरुवात कशी करू शकता, याचा विचार करा. जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही जी प्रक्रिया आणि पावले उचलता, ती समजून घेणे योग्य आहे. आम्ही दररोज छोट्या-छोट्या गोष्टी करतो. परंतु, जीवनातील साध्या आनंदांचा खरोखर आनंद घेण्यासाठी आपण त्यांचा पूर्ण अनुभव घेणे आवश्यक ठरते.
 
 
-डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.