शिवसेनेचे ‘ठाणे’ एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

    23-Jun-2022
Total Views | 65

thane 3
 
  
 
 
 
ठाणे : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेना आमदार व मंत्र्यांनी बंडाळी केल्याने ठाकरे सरकार हादरले आहे. एकनाथ शिंदे गट दोन दिवस राज्याबाहेर भ्रमण करत आहे. याविरोधात सेनेच्या मुंबईतील गोटात शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त होत असताना ठाण्यात मात्र शिंदे समर्थकांनी ठाणे शहरात बॅनरबाजी करून लक्ष वेधून घेतले आहे. शहरात अनेक ठिकाणी, जागोजागी ’आम्ही शिंदे समर्थक’ असे बॅनर झळकलेले दिसून येत असून, या बॅनरमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे.
 
 
 
तसेच,या बॅनरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ‘धर्मवीर’आनंद दिघे यांच्या छबी झळकत असून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा साधा उल्लेखही नाही. एकेकाळी कट्टर आणि आक्रमक शिवसैनिक म्हणून ठाण्याकडे पाहिले जाते, त्यामुळे शिवसेनेचे ’ठाणे’, ठाण्याची शिवसेना असे समीकरण होते. मात्र, शिंदे यांनी घेतलेल्या या भूमिकेचे ठाण्यात समर्थन केले जात असून शहरभर शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर झळकत आहे. आदित्य यांच्या युवासेनेच्या शिलेदारांनीही शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन पाठिंबा दर्शविला आहे.
 
 
 
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३५ ते ४० आमदारांसह सुरत आणि आमच्या गुवाहाटीमध्ये ठाण मांडले आहे. शिंदे यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे राजकीय भूकंप झाला असला तरी अद्याप तरी शिवसैनिकांकडून त्यावर कोणतीही तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. ठाणे शहरातील शाखा, पक्ष कार्यालये, आनंदाश्रम आणि महापालिकेच्या परिसरात शुकशुकाट दिसत असताना बुधवारी मात्र शिवसैनिकांकडून शिंदे यांचे समर्थन केले जाऊ लागले आहे. बुधवारी सकाळपासून ठाणे शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी शिंदे समर्थकांकडून फलक लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाणेकर असल्याचे ध्वनीत होत असून शिवसेनेचे ’ठाणे’ आता एकनाथ शिंदेचे ’ठाणे’ बनल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
 
 
 
आजी-माजी पदाधिकारीही शिंदेंच्या पाठीशी
 
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता असून मोठ्या प्रमाणावर शिंदेंचे खंदे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ठाण्यात माजी नगरसेवकांचा पाठिंबादेखील एकनाथ शिंदे यांना असल्याचे बोलले जात आहे, तर या सर्व घडामोडी संदर्भात सेनेचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता अनेकांनी मौन बाळगले आहे.
 
 
होय, आम्ही शिंदे समर्थक!
 
‘आम्ही शिंदे समर्थक’, शिंदे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, शिंदे साहेब ‘आगे बढो, हम आपके साथ है’, ‘वाघ एकला राजा’ अशा आशयाच्या फलकांनी ठाणे, कळवा, कल्याण-डोंबिवली परिसरातील चौकांमध्ये शिवसैनिकांकडून जाहीर पाठिंबा व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे समर्थक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि ९० टक्के नगरसेवकांनीही शिंदे यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचे फोटो असून उद्धव ठाकरे तसेच आदित्य यांना वगळण्यात आले आहे. तसेच, आम्ही एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे यांच्या बाजूने उभे राहू व ते ज्या पक्षामध्ये प्रवेश घेतील त्याला आमचं समर्थन असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121