सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुलेंवर येणार बायोपिक

निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांच्याकडून घेतले चित्रपटासाठीचे राईट्स

    दिनांक  12-Jan-2022 12:44:52
|

Nilu Phule
 
 
मुंबई : मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल ४ दशके काम करणारे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांच्यावर आता बायोपिक येणार आहे. 'टिप्स' कंपनीचे कुमार तौरानी यांनी निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांच्याकडून चित्रपटासाठीचे राईट्स देखील घेतले आहेत. तसेच, या चित्रपटावर काम सुरु असून याच वर्षी त्याच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. अद्याप यामध्ये निळू फुलेंची भूमिका कोण साकारणार, याची घोषणा झालेली नाही.
 
 
 
हेही वाचा :  
 
 
 
कुमार तौरानी यांनी सांगितले की, "आम्ही निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांच्याकडून निळू फुले यांच्यावर बायोपिक बनवण्याचे अधिकार घेतले आहेत. तर याचवर्षी आम्ही कामाला सुरुवात करू." निळू फुलेंनी आपल्या अभिनयाने देशभरात सर्वांची मने जिंकली आहेत. पडद्यावर खलनायक म्हणून भूमिका साकारणारे निळू फुले हे वास्तविक आयुष्यात मात्र एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते होते. निळू फुले यांचे २००७ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.