जम्मू-काश्मीरमध्ये आढळले १२०० वर्ष जुने दुर्गेचे शिल्प

    दिनांक  31-Aug-2021 18:17:11
|
 

shipa_1  H x W:

जम्मू-काश्मीर :
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी बडगाम जिल्ह्यातील खान साहिब परिसरातून देवी दुर्गाचे सुमारे १२०० वर्ष जुने शिल्प जप्त केले. बडगामचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) ताहिर सलीम खान यांनी हे शिल्प पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे उपसंचालक मुश्ताक अहमद बेघ आणि त्यांच्या टीमला दिले.


police_1  H x W
एएनआय बडगामचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) ताहिर सलीम खान यांनी हे शिल्प अर्काइव्ह, पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे उपसंचालक मुश्ताक अहमद बेघ आणि त्यांच्या टीमला दिले.१३ ऑगस्ट २०२१ रोजी नदीतून वाळू काढणाऱ्या मजुरांकडून श्रीनगरच्या पांड्रेथान येथील झेलम नदीतून हे शिल्प सापडले होते,असे जम्मू -काश्मीर पोलिसांनी सांगितले.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.