कोरोनानंतर दारू प्यायल्यामुळे मोठा धोका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Aug-2021
Total Views |

covid _1  H x W




ठाणे : हृदय, फुफुसे, किडनी व मेंदू याप्रमाणे यकृत सुद्धा हा आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव असून तो सर्वात जास्त दुर्लक्षित अवयव सुद्धा आहे. साखरेच्या स्वरूपात ऊर्जा जमविणे, निकाम्या लाल रक्तपेशी वर प्रक्रिया करणे, जीवनसत्वांचा साठा जमविणे, शरीराला आवश्यक असलेल्या क्षारांचा साठा करणे, आतड्यातून शरीरात जाणाऱ्या जंतूचा नायनाट करणे अशी अनेक कामे आपले यकृत करीत असते. परंतु गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे व बैठ्या जीवनशैलीमुळे यकृताचे आजार वाढत असल्याचे निरीक्षण कल्याणच्या साई स्वस्तिक हॉस्पिटलने केले असून नागरिकांमध्ये वाढत्या दारूच्या व्यसन हे सुद्धा एक महत्वाचे कारण उघड झाले आहे.


रुग्णालयाचे संचालक डॉ. तुषार ठेंगने म्हणाले, "भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढल्याने मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी सारखे आजार त्यांना जडत आहेत. त्याचबरोबरीने यकृताचे आजार बळावत आहे. १० पैकी ३ भारतीयांना यकृतातील मेदाचा (फॅटी लिव्हरचा) त्रास झालेला आहे. वेळीच लक्ष दिल्यास हा आजार टाळता येऊ शकतो. पण, निदान झाले नसल्यामुळे याची जाणीव अनेकांना नसते. वेळी अवेळी खाणे - पिणे, एकाच ठिकाणी बसून काम करणे, कोरोनामुळे आर्थिक व कौटुंबिक अडचणीमुळे होणारा मानसिक ताण तणाव व एकूणच समाजामध्ये वाढलेले मद्यपानाचे प्रमाण यामुळे यकृताचे आजार वाढत आहेत."
हजारातील १०० नागरिकांपैकी ३० जणांना जणांना यकृतातील मेदवाढीचा आजार जडलेला आहे.




वेळीच उपचार केल्यास आजार बरा होऊ शकतो अशी माहिती साई स्वस्तिक हॉस्पिटलचे संचालक डॉ. तुषार ठेंगने यांनी दिली, दारू व यकृताचा आजार याविषयी बोलतां ते म्हणाले, "दारूमुळे आपल्या यकृतामध्ये इथानोल जाते, कमी प्रमाणात इथानोल यकृत पचवते परंतु जास्त प्रमाणात याचे प्रमाण शरीरात गेल्यावर ते यकृत खराब करते. दारूचे सेवन केल्यानंतर आपल्या पेशीमध्ये फ्री ऑक्सिजन रॅडीकलला हाताळण्यासाठी एक प्रणाली असते. इथोनोलमुळे अल्डीहाईडचे प्रमाण जास्त झाले तर जास्त फ्री रॅडिकल्स तयार होतात. मग त्यांना हाताळणारी आपल्या शरीरातील यंत्रणा पूर्णपणे थकून जाते. मग अशा वेळी अजून नवीन फ्री रॅडीकल तयार झाले तर पेशींना इजा जास्त होते. अल्डीहाईड हा घटक यकृताच्या पेशी साठी धोकादायक ठरते."


ते म्हणाले, "पुढील काही वर्षांत यकृतातील वाढलेला मेद ही आरोग्य क्षेत्रातील मोठी समस्या बनणार आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाचा शिकार होताना दिसत आहे. पुढच्या काही वर्षांत हे चित्र असेच राहिल्यास यकृताचे आजार वाढतील. प्राथमिक अवस्थेत यकृताच्या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्यामुळे नियमित तपासणी करणे हा एकच पर्याय आहे. यकृत हा आपल्या शरिरातील अत्यंत महत्त्वाचा भाग. काही चुकीच्या पद्धतींमुळे, औषधांमुळे किंवा किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष केल्याने ब-याचदा एखादा मोठा आजार डोकं वर काढतो. थकवा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, पायाला सूज येणे, उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणे आढळली तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे असे आवाहन साई स्वस्तिक हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे."


जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात दरवर्षी होणार्‍या मृत्यूंपैकी ६ टक्के मृत्यू दारूमुळे होतात. वास्तविक पाहता अधिक दारू पिण्याचा परिणाम दोनशेहून अधिक आजाराशी संबंधित आहे. मद्याच्या सतत सेवनामुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. हळूहळू यकृत आकुंचन पावते. पेशी काम करेनाशी होतात. या स्थितीला लिव्हर सिऱ्हॉसिस म्हणतात. मद्याच्या अधिक सेवनामुळे मृत्यू ओढवू शकतो.




स्टडीज ऑन अल्कोहोल अ‍ॅण्ड ड्रग्जच्या सर्वेक्षणानुसार कमी वयात दारूचे व्यसन लागल्यास ती सोडल्यावर त्याचे परिणाम दीर्घ वयापर्यंत दिसून येतात. त्यामुळे वय वाढल्यावर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. लिव्हरचे काम कमी झाले तर आपल्याला आरोग्याचे वेगवेगळे त्रास सुरू होतात . हे आजार अतिशय गंभीर सुद्धा ठरू शकतात. हृदय किडनी यासारखा यकृत सुद्धा आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे,असा महत्वाचा सल्ला साई स्वस्तिक हॉस्पिटलचे संचालक डॉ. तुषार ठेंगने यांनी दिला आहे.






@@AUTHORINFO_V1@@