'बडवे ग्रुप ऑफ कंपनीज्'चे चेअरमन शंकर बडवे यांचे निधन

    दिनांक  04-May-2021 20:35:06
|

shrikant badave_1 &n


पुणे :
बडवे ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन शंकर प्रभाकर बडवे यांचे मंगळवारी दि.४ रोजी पुण्यात वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. प्रगतशील उद्योजक श्रीकांत बडवे यांचे ते वडिल होते. बजाज ऑटो कंपनीत उच्चपदावर शंकर बडवे यांनी ३७ वर्षे काम केल्यानंतर १९८७ साली 'बडवे ग्रुप ऑफ कंपनीज्'ची मुहूर्तमेढ रोवली.
 
 
 
चेअरमन शंकर बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३३ वर्षात कंपनीने देशभरात प्रकल्पांचे विस्तारीकरण करत पाच हजार कोटी रूपयांची उलाढाल असलेला मराठी उद्योजकाचा उद्योगसमुह असा नावलौकिक प्राप्त केला आहे. शंकर बडवे यांच्या निधनाने ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका बड्या व्यक्तिमत्वाला उद्योगविश्व मुकले असल्याच्या भावना या क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केल्या. कै. शंकर बडवे यांच्या पश्चात पत्नी कुमुद, श्रीकांत आणि संजय ही दोन मुले, एक मुलगी, सुप्रिया आणि योगिता या सुना तसेच सुमेध व स्वस्तिद हे नातू असा परिवार आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.