मोदी सरकारची देशवासियांना दिवाळी भेट, पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात ५ तर डिझेलच्या उत्पादन शुल्कात १० रूपयांची कपात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2021
Total Views |
fuel_1  H x W:


सर्वसामान्यांना मोठा दिलासा
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे शंभरी पार केलेल्या इंधन दरांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर घट होणार असून नवे दर उद्यापासून लागू होणार आहेत. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी करावा, असेही आवाहन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले आहे.
 
 
देशात गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल – डिझेलसह इंधनांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशातील बहुतांशी शहरांमध्ये पेट्रोलने दराची शंभरी ओलांडली आहे. मात्र, दिवाळीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरी उत्पादन शुल्क अनुक्रमे ५ आणि १० रुपयांची कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
 
 
करोना काळातही भारतीय अर्थव्यवस्थेने अभुतपूर्व गती पकडली आहे. त्यास अधिक वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने त्याचा वापर वाढेल आणि महागाई कमी होईल. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना मदत होईल. आजच्या निर्णयामुळे एकूणच आर्थिक चक्राला चालना मिळण्याची अपेक्षाही केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@