राष्ट्रीय सर्वेक्षणात पुणे शहराची बाजी

राष्ट्रीय पातळीवर पुणे शहराचं तिहेरी यश

    दिनांक  22-Nov-2021 00:41:44
|

Murlidhar Mohol_1 &n
 
 

पुणे : या वर्षी झालेल्या विविध राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षणात पुणे शहराने तिहेरी यश संपादित केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार/मानांकन स्पर्धेत पुणे शहराने तीन पुरस्कार जिंकले आहेत. 'बेस्ट सेल्फ सस्टेनेबल बिग सिटी' या प्रकारात पुणे शहर देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुणे शहर देशात पाचव्या स्थानावर झेपावले आहे आणि 'कचरामुक्त शहर' म्हणून पुण्याला थ्री स्टार पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. असे हे तिहेरी यश नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे शहराने पटकावले आहे. गेल्या दोन वर्षांपासून 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत भरवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धेत पुणे शहराची चांगली कामगिरी झाली न्हवती. यंदा मात्र पुणे शहराने मिळवलेल्या तिहेरी यशामुळे पुणे शहराने या राष्ट्रीय पातळीवरील विविध स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या ४८ शहरांमध्ये पुणे शहराला देशात पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे. तर या श्रेणीमध्ये सहभागी झालेल्या ४३२० शहरांमध्ये पुण्याने देशात दहावा क्रमांक मिळवला आहे. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत पुणे शहर ३७व्या स्थानावर होते तर दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत पुणे शहर देशात १५ व्या क्रमांकावर होते. याबाबत पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी '' हे यश पुणेकरांचे असून त्यांच्या सहभागाने आगामी काळात देखील अनेक समाजउपयोगी आणि पर्यावरणपूर्वक उपक्रम राबविण्यात येतील. पुणे शहराला मिळालेले हे तिहेरी यश ही पुण्यासाठी अभिमानाची बाब असून पुणे शहराच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासकामांची पावती या पुरस्काराच्या नीतिमित्ताने पुन्हा एकदा मिळाली आहे. पुणे शहराला मिळालेले सर्वच स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार/मानांकन अत्यंत महत्त्वाचे आहेत. एकीकडे कोरोना संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे शहराच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देऊन राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करता आली याचे समाधान आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी पुणे शहराला एकूणच स्वच्छतेमध्ये १५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते, मात्र यंदा यात मोठ्या सुधारणेसह देशात ५ वे स्थान प्राप्त झाले. शहर स्वच्छतेसाठी राबवणाऱ्या, व्यवस्थापन करणाऱ्यांसह समस्त पुणेकरांचे मनःपूर्वक अभिनंदन !'' अशी प्रतिक्रिया दिली. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून स्वच्छ अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत’, देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली़ होती .

 
यामध्ये यावर्षीही इंदोर शहराने प्रथम क्रमांक मिळविला असून, दुसऱ्या क्रमांकावर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर विजयवाडा व चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई यांनी स्थान पटकावले आहे़. याबाबतीत पुणे शहराला देण्यात आलेला पुरस्कार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक़ुणाल खेमनार, पुणे महापालिका घनकचरा विभागाचे उप आयुक्त अनिल देशमुख, स्वच्छ सर्वेक्षण उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़ केतकी घाटगे यांनी हा सन्मान, नगरविकास मंत्रालयाचे सचिव महुआ यांच्याकडून स्विकारला. यावेळी पुण्याला राहण्यास उत्तम शहर (बेस्ट सस्टेनेबल बिग सिटी) या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक व जीएफसी अंतर्गत थ्री स्टार मानांकनाने दखील गौरविण्यात आले आहे . कोरोना महामारीच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अथक परिश्रम, पुण्याच्या नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व स्वयंसेवी संस्था यांचे सांगीतिक प्रयत्न व नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा अंतर्भाव, यामुळे हा सन्मान प्राप्त झाला असून, यापुढील काळातही लोकसहभागातून उत्तरोत्तर प्रयत्न करणार असल्याचे या वेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ़ कुणाल खेमनार यांनी सांगितले. तर पुणे शहरातील लोकप्रतिनिधी, पुणे महापालिका आयुक्त, स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या संस्था, सिटीझम फोरम पुणेकर, यांचा या स्पर्धेत मोलाचा सहभाग मिळाला असल्याचे उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.