झुकरबर्गचा 'टाईम' खराब : फेसबूक डिलीट कव्हरस्टोरीमुळे अडचणी

फेसबूक डाऊन झाल्यानंतर सुरू झाले शुक्लकाष्ठ

    दिनांक  08-Oct-2021 19:10:47
|

TIME _1  H x W:

कॅलिफोर्निया : मार्क झुकरबर्गसाठी सध्याचा कालावधी काही ठिक नाही. ५ ऑक्टोबरला जेव्हा फेसबुक, व्हॉट्सएप आणि इन्स्टाग्राम एकत्र कित्येक तास ठप्प झाले होते, त्यानंतर फेसबूकसह कार्यरत असणाऱ्या फ्रान्सेस हॉगेन यांनी धक्कादायक आरोप लावले आहेत. झुकरबर्ग यांच्या प्रोडक्टमुळे त्यांच्या मुलांचे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यातच आता टाईम मासिकानेही झुकरबर्गला लक्ष्य केले आहे. 'डिलीट फेसबुक' या नोटीफिकेशनसह कॅन्सल या डिलीट असा पर्याय ठेवला आहे.फ्रान्सेस हॉगेन वारंवार कंपनीबद्दल बरेच खुलासे करत आहे. अमेरिकेच्या काँग्रेसचे म्हणणे आहे की, चीन आणि ईराण आपल्या शत्रुची माहिती गोळा करण्यासाठी फेसबूकची मदत करत आहेत. मात्र, फेसबुककडे यापासून संरक्षण करणारी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका मानला जात आहे. फेसबुकने पैसे कमाविण्यासाठी लोकांच्या जीवाची सुरक्षा पणाला लावली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कंपनीने थांबविले चुकीच्या पोस्ट हटवणाऱ्या टीमचे काम
टाईम मासिकाने झुकरबर्ग यांच्यावर मुखपृष्ठ कथा तयार केली आहे. फेसबूकच्या सिविल इन्टेग्रटीबद्दल अधिक माहिती दिली आहे. त्यात म्हटल्यानुसार, सोशल मीडियावर भ्रम पसरवणाऱ्या आणि नकारात्मक पसरवणाऱ्या सदस्यांना वेगळे केले. फेसबुकने डिसेंबर २०२०मध्ये ही कार्यवाही करण्यात आली. फ्रांसेस हॉगेन यांनी खुलासा करण्यात आल्याने ही बाब आत्ता उघड होत आहे. होगल यांनी कंपनीने इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम तरुणांवर कसा वाईट प्रभाव टाकत आहे, याबद्दलचे अंतर्गत सर्वेक्षण लपवल्याचाही आरोप केला आहे.


मार्क जुकरबर्गने या व्हिसलब्लोअरच्या दाव्यांवर पलटवार केला आहे. त्यात या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे. फेसबुक कर्मचाऱ्यांना एक प्रत पाठविली असून त्यात याबद्दलचे तथ्य फेटाळून लावले आहे. दोन गटांमध्ये भडकविणाऱ्या आशयाला फायद्यासाठी जाणूनबुजून प्रसारित केल्याचा आरोप फेसबूकवर लावण्यात आला. हे सर्व आरोप झुकरबर्ग यांनी फेटाळले आहेत.


कोण आहेत फ्रान्सिस ज्यांनी लावले फेसबूकवर आरोप ?
फ्रांसेस हॉगेन फेसबुकच्याच एक कर्मचारी आहेत. ज्या कंपनीत डाटा एनालिस्ट म्हणून काम पाहत आहेत. जगासाठी फेसबूकद्वारे काहीतरी चांगल्या गोष्टी करता येतील, म्हणून मी कंपनीत रुजू झाले, असे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचे प्रोडक्ट मुलांसाठी नुकसानकारक आहेत, लोकशाही धोक्यात घालणारे आहेत. दुही माजविणारे आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.