देगलूर-बिलोलीतील जनता भाजपच्या ठामपणे पाठीशी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

Pranita Chikhalikar _1&nb


नांदेड (गायत्री श्रीगोंदेकर) : “ग्रामीण भागांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या योजना आणल्या आहेत, त्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघातील नागरिक भाजपवर अत्यंत खूश आहेत. इथे ग्रामीण भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इथल्या नागरिकांना विकास हवा आहे. केंद्र सरकार विशेषतः शेतकर्‍यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी ज्या विकासात्मक योजना आखत आहे. त्यामुळे इथला सर्वसामान्य नागरिक हा भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा विश्वास भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी रविवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
 
 
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात शनिवार, दि. 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे असणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेन अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आ. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनांमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकांचे निकाल दि. 2 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा हा गड भेदण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सोमवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देगलूर-बिलोलीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. खा. प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारसभामुळे देगलूरमध्ये आता रंगत येत आहे.
 
 
याबाबत प्रणिता चिखलीकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, “ही निवडणूक भाजप विकासाच्याच मुद्द्यावर लढवत आहे. ’सबका साथ सबका विकास’ हे ध्येय भारतीय जनता पक्षाचे आहे. हा भाग कोणाचा गड आहे किंवा कोणाचे वर्चस्व आहे, यापेक्षा भाजपने इथल्या जनतेच्या मनात जे स्थान बनवले आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. कारण, जेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार होते तेव्हा शेतकर्‍यांना बोंड अळीचे पैसे मिळत होते. पीक विम्याचे पैसे मिळत होते. ‘शेतकरी सन्मान योजना’ मिळत होती. ‘जलयुक्त शिवार’सारखी योजना येथे होती, जी अत्यंत प्रभावीपणे येथे राबविण्यात आली होती. त्यामुळे भाजपबद्दल अत्यंत जनतेच्या मनात अत्यंत चांगली भावना होती. मात्र, आज जर पाहिले तर येथे जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर सलग तीन महिने अतिवृष्टी झाली. इतके होऊनही महविकास आघाडीकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही किंवा शेतकर्‍यांना पुरेशी मदत देण्यात आली नाही. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदी असतानाही त्यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांची विचारपूस करण्याचे, त्यांना दिलासा देण्याचे काम केले,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
पुढे त्या म्हणाल्या की, “शेतकर्‍यांना केवळ दहा हजाराची मदत या सरकारने केली. नासलेले, खराब झालेले शेतातील पीक काढण्यासाठीही ही मदत अपुरी आहे. शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करते आहे. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत अत्यंत नाराजीचे वातावरण इथल्या ग्रामीण भागात आहे. मात्र, शेतकरी अडचणीत सापडला असताना सरकार म्हणून महाविकास आघाडीचे ठोस धोरण असणे गरजेचे आहे. मात्र, असे कोणतेही धोरण महाविकास आघाडीत दिसून येत नाही. शेतकर्‍यांना आर्थिक मदत तर सोडाच त्यांच्या सरकारमधील मंत्रीही याठिकाणी आले नाहीत, यापेक्षा दुसरे दुर्दैव आणखी काय?,” अशी टीकाही त्यांनी महाविकास आघाडीवर केली.


@@AUTHORINFO_V1@@