भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने दिली मंजुरी

    दिनांक  12-Oct-2021 16:41:56
|

covaxin_1  H xनवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या दरम्यान, लस हे सर्वात मोठे शस्त्र मानले जात आहे आणि आता देशात २ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी लसीबाबत मोठी बातमी येत आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील मुलांसाठी मंजूर होणारी ही पहिली लस आहे.
कोवॅक्सिन चाचणीमध्ये ७८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले


भारत बायोटेकने सप्टेंबरमध्ये मुलांवर लसीची चाचणी पूर्ण केली आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये सुमारे ७८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. कंपनीने आकडेवारी सादर केल्यानंतर, भारतीय औषध नियंत्रक जनरल (DCGI) ने मूल्यांकन केल्यानंतर कंपनीकडून अतिरिक्त डेटा मागितला होता, जो शनिवारी सादर करण्यात आला. काल (१२ ऑक्टोबर) देखील विषय तज्ज्ञ समितीची बैठक अर्थात एसईसी यासंदर्भात आयोजित करण्यात आली होती आणि आज झालेल्या बैठकीत २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोवाक्सिन लागू करण्याची परवानगी देण्यात आली.

मुलांना कोवॅक्सिनचे २ डोस दिले जातील

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून मंजुरी मिळाल्यानंतर २ ते १८ वर्षे वयाच्या मुलांसाठी लस मोहीम लवकरच सुरू केली जाईल. मुलांसाठी कोवाक्सिनचे दोन डोस दिले जातील.


देशात आतापर्यंत ९५.८९ कोटी डोस देण्यात आले आहेत

भारतात लसीकरण मोहीम १६ जानेवारी रोजी सुरू झाली आणि आतापर्यंत १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण केले जात आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे ९५ कोटी ८९ लाख ७८ हजार ४९ डोस देण्यात आले आहेत. भारतात ६८ कोटी ६५ लाख ८० हजार ५७० लोकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे, तर २७ कोटी २३ लाख ९७ हजार ४७९ लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.