शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी!

    दिनांक  05-Sep-2020 18:58:52
|
Samuel_1  H x W


रियासह दोघांची एकत्रित चौकशी होणार!


मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेला रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला एनसीबीने या दोघांना एनसीबीने काल अटक केली होती. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची म्हणजेच ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.


शौविक आणि सॅम्युअल यांच्या अटकेनंतर सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंग यांच्या सांगण्यानुसार, “एनसीबीने शौविक आणि सॅम्युअलवर अटकेची कारवाई केली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अनेक वेगळे अँगल आहेत. या सर्वाचा तपास केल्यावर अजून माहिती नक्कीच समोर येईल अशी सुशांतच्या कुटुंबाची अपेक्षा आहे.”


शौविक आणि सॅम्युअलने सुशांतला नशेची सवय लावल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले. त्यानंतर तपासणी आणि चौकशी करून काल या दोघांनाही अटक करण्यात आली. न्यायलयात हजर करण्यापूर्वी या दोघांनाही शीव रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.


सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक केली. त्याआधी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांची १० तास चौकशी केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी दोघांच्या घरांवर छापे टाकले. यात कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल फोन आदी ताब्यात घेत दोघांना चौकशीसाठी सोबत नेले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.