सीबीआय आणि एम्सची टीम सुशांतच्या वांद्रास्थित घरी दाखल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2020
Total Views |
sushant_1  H x


ड्रग्ज अँगलमध्ये रिया चक्रवर्तीला अटक होण्याची शक्यता!


मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर ताब्यात घेत्न्यात आलेल्या मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती यांना आज कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. तेथून त्यांना एनसीबीच्या कस्टडीत पाठवले जाऊ शकते. तत्पूर्वी लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये शोविक आणि मिरांडा यांची मेडिकल चाचणी करण्यात येणार आहे. सोबतच ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेले कैजान इब्राहिम आणि जैद यांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या चौघांचीही कोरोना टेस्ट केली गेली. सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान सीबीआयची टीम सुशांतच्या वांद्रास्थित घरी पोहोचली आहे. येथे सुशांतची बहीण मितू सिंह ही देखील हजर आहे.


सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक केली. त्याआधी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांची १० तास चौकशी केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी दोघांच्या घरांवर छापे टाकले. यात कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल फोन आदी ताब्यात घेत दोघांना चौकशीसाठी सोबत नेले. दोघांची रात्री ९.३० पर्यंत चौकशी झाली आणि नंतर लगेच त्यांना अटक केली.


@@AUTHORINFO_V1@@