सुशांत प्रकरण तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2020
Total Views |
sushant_1  H x


सीबीआय तपासणीस सुरुवात!


मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांतसिंह प्रकरण तपासासाठी सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला.


सुवेझ हक हे सीबीआयचे नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सीबीआयचे १० सदस्यीय पथक मुंबईत दाखल झाले आहे. पाच टीम बनवून एसआयटी शुक्रवारपासून मुंबईत या प्रकरणाची चौकशी सुरू करणार आहे. सीबीआयने आधीच स्थापन केलेली स्पेशल इन्विस्टिगेशन टीम या प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे. यात सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर मनोज शशीधर, आयपीएस गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि अॅडशिनल एसपी अनिल यादव यांचा समावेश आहे.


या प्रकरणातली केस डायरी, क्राईम सीनवरचे फोटो, ऑटोप्सी रिपोर्ट आणि आत्तापर्यंत घेतलेल्या जबानींची प्रत या सगळ्या गोष्टी मुंबई पोलिसांना या टीमला सादर कराव्या लागणार आहेत. सीबीआयचा तपास हा बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असणार आहे.


मागच्या वेळी तपासासाठी आलेले बिहार पोलिस टीमचे अधिकारी विनय तिवारी यांना बीएमसीने क्वारंन्टाईन केले होते. आता मात्र सीबीआयची ही टीम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दाखल होतेय, शिवाय तपासात महाराष्ट्र सरकारने पूर्ण सहकार्य करावे, असेही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. १४ जून रोजी सुशांत त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होते. त्याच्या कुटुंबीयांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केल्याने पुढील तपासासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले आहे.







@@AUTHORINFO_V1@@