भारताला 'असहिष्णू' मानणाऱ्या आमीर खानची तुर्कीला सप्रेम भेट!

    दिनांक  17-Aug-2020 11:26:48
|
Aamir khan_1  H

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरला, पण भारताच्या विरोधकांना भेटायला नाही; चाहत्यांची आमीरवर जोरदार टीकामुंबई : ‘लालसिंग चढ्ढा’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने तुर्कीत असलेल्या अभिनेता आमीर खानने तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांची पत्नी आणि देशातील पहिली महिला एमीन एर्दोगान यांची भेट घेतली. इस्तंबूलमधील प्रेसिडेन्शिअल पॅलेस ह्युबर मॅन्शन येथे झालेली ही भेट सध्या वादग्रस्त ठरत आहे. या भेटीमुळे आमीरचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.


या आधी आमीर खानची याची पत्नी किरणने, भारत देश ‘असहिष्णू’ असल्याचे म्हंटले होते. किरण खान नेहमीच भारत विरोधी भूमिका घेताना दिसते. तर दुसरीकडे तुर्कीनेही भारत विरोधी भूमिका घेत कायम पाकिस्तानला पाठींबा दर्शविला आहे. काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्या पाकिस्तानच्या मागणीला तुर्कीने पाठींबा दिला होता. त्यामुळेच आता आमीरची ही भेट त्याच्यासाठी वादग्रस्त ठरत आहे.तुर्कीची सरकारी वृत्तसंस्था अनाडोलूने जारी केलेल्या माहितीनुसार, आमीर खानने या भेटीसाठी विनंती केली होती. भेटीदरम्यान आमीरने एमिन एर्दोगन यांना त्याने सुरू केलेल्या सामाजिक जबाबदारीच्या प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये आमीर आणि त्याची पत्नी किरण राव यांनी स्थापना केलेल्या वॉटर फाउंडेशनचादेखील समावेश आहे. या माध्यमातून भारतातील दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचविण्याची आमीर खानची योजना आहे.


भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कीच्या या कुटुंबाला आमीरने भेट दिल्याने त्याच्या चाहत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारताच्या स्वातंत्र्यदनाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, मात्र तुर्कीच्या प्रथम महिलेला भेटण्यास आमीरकडे खूप वेळ होता. भारत असहिष्णू वाटणाऱ्या आमीर आणि किरण यांना आपले दुसरे घर बसविण्यासाठी जागा मिळाल्याचे म्हणत, आमीरवर जोरदार टीका केली आहे. तर काही जणांनी त्याच्या या कृतीमुळे ‘लालसिंग चढ्ढा’ या त्याच्या आगामी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.