‘बिग बॉस’ फेम अनिल थत्तेंना कोरोनाची लागण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2020
Total Views |

Anil Thatte_1  



फेसबुकवरून अनिल थत्तेंनी दिली माहिती; कोरोनातून बरे झाल्यावर प्लाझ्मा दान करण्याचा निर्धार! 


मुंबई : अनिल थत्ते यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आपली अनोखी पोषाख पद्धती आणि गगनभेदी या साप्ताहिकामुळे राज्यभर आपला चाहतावर्ग निर्माण करण्यात अनिल थत्ते यशस्वी ठरले आहेत. मराठी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात त्यांचा सहभागचांगलाच गाजला होता. त्यामुळे त्यांना बिग बॉस फेम म्हणूनही ओळखले जाऊ लागले. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती अनिल थत्ते यांनी स्वत:च फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.







फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अनिल थत्ते यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, ‘आता मी हॉस्पिटलमध्ये आहे. होरायजन हॉस्पिटलमध्ये मी भरती झालो आहे आणि मला कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. गेले दोन महिने मी घरात बसून वर्क फ्रॉम करत होतो. परंतु हे व्हायचं ते झालंच. इतकी काळजी घेऊनही तो होत असेल तर काय करायचं. पण, ठिक आहे. तो एकदाचा झाला. तो होणार होणार या विचारात मी होतोच. त्यामुळे एक चांगलं झालं, आता माझी कोरोनाची भीती संपली.'


व्हिडिओत पुढे बोलताना अनिल थत्ते यांनी म्हटले आहे की, ‘वयाच्या ७२ व्या वर्षी मला मधुमेह आणि अन्य अजारही आहेत. त्यामुळे डॉक्टरांनाही काळजी वाटत होती. परंतु, आता काळजीचे कारण नाही. माझी प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आता कोरोना व्हायरसमधून बरा झालो की पहिले एक काम करणार. मी प्लाझ्मा दान करणार. ज्यांना कुणाला कोरोना व्हायरस झाला असेल त्यांच्यासाठी तो उपयोगी येईल’, असेही थत्ते यांनी या वेळी सांगितले. कोरोनासारख्या गंभीर आजारातही बरे झाल्यावर इतरांच्या मदतीसाठी प्लाझ्मा दान करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे सगळ्यांकडून कौतुक होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@