‘कोरोना’ उपचाराचे भरमसाठ बिल! नानावटी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2020
Total Views |

Nanavati_1  H x



मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नानावटी रूग्णालयाविरोधात तक्रार दाखल!


मुंबई : कोरोनाबाधीत रूग्णांकडून खासगी रूग्णालयात पैसा उकळण्याचे प्रसंग रोजच पहायला मिळत आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार मुंबईतील सुप्रसिद्ध नानावटी रुग्णालयातून समोर आला आहे. मुंबई महापालिकेकडून आता या रूग्णालयाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या एका कोरोनाबाधीत रूग्णांकडून अव्वाची सव्वा बील आकारल्याची माहिती महापालिकेच्या तपासाअंती समोर आली. अखेरीस पालिकेकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर वेळेत आणि कमी पैशात उपचार व्हावेत, म्हणून राज्य सरकारने काही नियम आणि दर आखून दिले आहेत. सरकारी दरपत्रकानुसार बील न आकारता मनमानी पद्धतीने बिल आकारणी केल्याने सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये नानावटी रुग्णालयाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. मुंबई महापालिकेच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली होती.


या रुग्णालयात तब्बल १७ लाख रुपयांपर्यंत बिले आकारली जात असल्याची माहिती आहे. तर एका मृत कोविड-१९ रुग्णाचे बिल ६ लाख ८५ हजार केले आणि बिल भरल्याशिवाय संबंधित रुग्णाचा मृतदेह दिला जात नव्हता, अशी तक्रार आल्यानंतर या केसच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात येत आहे.



@@AUTHORINFO_V1@@