कंगनाच्या बचावासाठी भारतीय फलंदाजाची तुफान बॅटिंग

    दिनांक  22-Jul-2020 16:52:42
|

kangana_1  H x
मुंबई :
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूंनंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूडच्या घराणेशाहीच्या विरोधात आपले अस्त्र पुकारले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तिला यासाठी पाठिंबा दर्शविला. परंतु यानंतर तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनाही आपल्या निशाण्यावर घेतले होते. यानंतर तिच्यावर टीकादेखील होत आहे. मात्र आता कंगनाच्या बचावासाठी भारताच्या फलंदाजाने तिच्या टीकाकारांवर तुफान बॅटिंग केली आहे.
मूळचा बंगालचा फलंदाज मनोज तिवारीने कंगनावर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. आपल्या ट्विटरच्या माध्यमातून त्याने कंगनाला पाठिंबा दर्शवत सुशांतच्या आत्महत्येमागची सत्य देशाला जाणायचे आहे असे विधान केले. तो म्हणतो,'कंगना विरुद्ध इतर, हा सामना सुरूच राहणार आहे, परंतु तो सुरू असताना मुळ मुद्दा भरकटू नये, हिच अपेक्षा. सोयीस्करपणे लोकं रोज सकाळीत उठतात आणि कंगनावर टीका करायला सुरुवात करतात. जर तिला पाठींबा देऊ शकत नसाल, तर किमान तुमची तोंडं बंद करा.कंगनाच्या विधानावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःची परीक्षा करावी. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, जसे कर्म कराल, तसं फळ मिळेल. सुशांतच्या आत्महत्येमागचे सत्य देशाला जाणायचे आहे.' सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, असे कंगणाने म्हटले होते. यावेळी तिने अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक व चित्रपट निर्माते यांना लक्ष्य केले होते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.