देशाला 'आत्मनिर्भर' करण्याची जबाबदारी भाजयुमो घेणार !

    दिनांक  04-Jun-2020 22:09:57
|

poonam mahajan_1 &nb
poonam mahajan_1 &nb

मोदी सरकार २.०च्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन
मुंबई :
कोरोना संकटाच्या काळात भारतीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता युवा मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपूर्णपणे डिजिटल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. डिजिटल राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक भाजप आणि देशातील इतर राजकीय पक्षांच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांनी या रॅलीचे उदघाटन केले व मार्गर्शन केले. तसेच भाजपचे राष्ट्रीय महामंत्री व प्रभारी मुरलीधर राव यांनी देखील संबोधित केले. ही बैठक तब्बल ६ तास चालली. भाजप युवा मोर्चा देशभरात ५ कोटी हँड सॅनिटायझर्स आणि ५ कोटी फेसमास्क वाटप करणार असल्याचा महत्वपूर्ण संकल्पया बैठकीत करण्यात आल्याचे भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल. संतोष म्हणाले की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रेरणेने आम्ही पाच प्रमुख निकष पाळले आहेत. गोरगरीबांना अन्न पुरवण्याचे काम असो, मास्क वापरण्याबाबत जनजागृती मोहीम असो, आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा कार्यक्रम असो, पीएम केअर फंडामध्ये योगदान देण्याची मोहीम असो की कोरोनो वॉरियर्सचा सन्मान असो, आपण सर्वांनी उत्कृष्ट काम केले आहे. आता आपल्याला ही 'आत्मनिर्भर भारत' ही मोहीम समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली पाहिजे."
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री व प्रभारी मुरलीधर राव म्हणाले की, आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत वेगाने प्रगती करेल. युवा मोर्चाचे उद्दिष्ट फक्त भाजपचे संघटन बळकट करणे नव्हे तर देश मजबूत करणे हे आहे. एकदा देश एक झाला की संघटना अधिक शक्तिशाली होईल." युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मागील दोन महिन्यांत केलेल्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले. गरजू लोकांपर्यंत स्वस्त धान्य पोहोचविण्याचा उपक्रम ते रक्तदान मोहिमेसाठी हातभार लावत हेल्पलाईन सुरू करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे.


या बैठकीत दोन महत्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आले. यापैकी पहिला प्रस्ताव 'आत्मनिर्भर भारताचा' की ज्याद्वारे आत्मनिर्भरता म्हणजे नेमकं काय आणि त्याचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजयुमो पार पडले. दुसरा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारचे कोरोनाच्या या संकट काळात देशवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आभार मानणारा प्रस्ताव मांडण्यात आला. लॉकडाऊन शिथिल होताच भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करायचे याबाबतदेखील मार्गदर्शन करण्यात आले.मोदी सरकार २.०च्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजनमोदी सरकारच्या २.०च्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरात भाजपच्या व्हर्च्युअल रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. या संपूर्ण वर्षात मोदी सरकारने केलेल्या कामाची व कोरोनाच्या या लढ्यात केलेल्या कार्याची माहिती या रॅलीतून लोकांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. या रॅलीची सुरुवात आजपासून भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम महाजन यांनी केली. 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.