सायन रुग्णालयाचे विदारक चित्र, डीनची उचलबांगडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020
Total Views |
 
sion_1  H x W:
 
 
मुंबई : एकीकडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्व स्तरांमधून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णांची गैरसोय होत आहे. नुकतेच भाजपच्या काही नेत्यांनी सायन रुग्णालयाचे विदारक चित्र समोर आणले होते. मृतदेहांच्या बाजूला कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते, असा व्हिडियो वायरल करण्यात आला होता. यावर आता कारवाई करत सायन रुग्णालयाचे डीन प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. रमेश भारमल हे सायन रुग्णालयातील नवे डीन असणार आहेत.
 
 
 
सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यामध्ये ज्या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याच वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ठेवले आहेत. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या समोर आला होता. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तसेच या रुग्णालयातली एका वॉर्डमधून रुग्ण पळून जात असल्याचे व्हिडीओही समोर आले होते. या दोन्ही घटनेनंतर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.
@@AUTHORINFO_V1@@