पालघर साधू हत्या प्रकरणावर कलाकार भडकले!

    दिनांक  21-Apr-2020 11:37:03
|
agralekh mob lynching pal

‘नराधमांची भूमी’, ‘मानवतेचा अपमान’; तीव्र शब्दांत व्यक्त केला संताप!


मुंबई : पालघरमध्ये जमावाकडून झालेल्या हल्ल्यात चोर समजून दोन साधू व त्यांच्या वाहनाच्या ड्रायव्हरला दगडाने ठेचून ठार करण्यात आले, या घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ही मॉब लिंचिंगची घटना अत्यंत लाजीरवाणी असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे. सगळ्याच स्तरांतून या घटनेवर संताप व्यक्त केला जात असतानाच कलाकारांनी ही या घटनेवर आपल्या उद्विग्न प्रतिक्रिया नोंदविल्या आहे.

'मी सुन्न झालोय. जे घडलं ते अत्यंत भीषण, भीतिदायक, लाजिरवाणं आहे. यापुढे महाराष्ट्र ही संतांची, वीरांची भूमी आहे असं बोलण टाळूया. याउलट ही नराधमांची भूमी आहे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला लागलेला काळा डाग आहे’, असे ट्विट करत अभिनेता सुमित राघवनने आपला संताप व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये सुमीतने उद्धव ठाकरे, राज्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालघर पोलीस यांना टॅग केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनेही ट्वीटरच्या माध्यमातून पालघर हत्येकांडप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पालघर जिल्ह्यात झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. आपल्या राष्ट्र निर्मितीत साधू- संतानी मोठ योगदान दिले आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात घडलेल्या घटनेवर कंगना राणावततीव्र निषेध करते. केवळ कमजोर लोकच जेष्ठांवर हात उचलतात, अशा आशायाचे कंगना रनौतने ट्विट केले आहे. या पोस्टसह तिने #JusticeForSadhu असा हॅशटॅगही शेअर केला आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी ‘हे काय सुरु आहे? हा मानवतेचा अपराध आहे’ असे म्हणत या घटनेचा निषेध केला आहे.
तर ‘साधूंची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कुठ्ल्याही परिस्थितीत ते सुटता कामा नये.’ असे अभिनेते-लेखक जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटले आहे.

आपल्या वादग्रस्त ट्विट्समुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्करने देखील यावर निषेध नोंदविला आहे. ‘पालघरची घटना निंदनीय असून, समाज म्हणून आपण कोण आहोत याचं लाजीरवाणं प्रतिबिंब दिसत आहे,’ अशा आशयाचं ट्विट करत तिने पालघर घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.