दिलासादायक ! डॉक्टरांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा

    दिनांक  23-Mar-2020 17:06:40
|


मुंबई _1  H x W


मुंबई : मुंबईत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत १५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर सोमवारी अजूनपर्यंत ६ त्यामुळे महामुंबईतील रुग्णांची संख्या आता ४२ वर पोहचली आहे. रविवारी ४७१ रुग्ण तपासणीसाठी ओपीडीत आले होते. त्यातील १३६ संशयित रुग्ण आढळले. १५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. १५६ जणांना दाखल करून घेण्यात आले आहे. तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपअधिकारी दक्षा शाह यांनी दिली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.