रत्नागिरी शहर भाजपची जंबो कार्यकारिणी जाहीर

    दिनांक  18-Mar-2020 15:02:14
|
BJP _1  H x W:

रत्नागिरी : भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी शहराची 'जम्बो' कार्यकारिणी जाहीर केली. यात सरचिटणीस, चिटणीस, विशेष निमंत्रित यांच्यासह १३८ जणांना स्थान देण्यात आले आहे. संदीप सुर्वे, राजन पटवर्धन यांची सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आहे.


राजन फाळके, नितीन गांगण, दादा ढेकणे, निलेश आखाडे यांची चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सुभाष देव यांच्यासह सात जणांना विशेष निमंत्रित म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. शेखर लेले, मिलिंद साळवी, सुजाता साळवी, निशा आलीम, नितीन सुर्वे, रामजीभाई भानुशाली यांची उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. अशा एकूण १३८ जणांना भाजपच्या शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.