ऊसतोड कामगाराचा मुलगा बनला पुढारी

    दिनांक  06-Feb-2020 20:07:36   


alam sheikh _1  


७० ते ८० सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्यामुळेच आलमचा ‘आलम पुढारी’ झाला. ‘पुढारी’ नावाने त्याने स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. एका वर्षाच्या आत आमदार निवास येथील पुढारी वस्त्रभांडाराचा तो मालक झाला. विधानसभा आणि विधान परिषदेचे असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यातील अंदाजे ६६ महिला आमदार आणि ५० इतर आमदार सोडून उरलेले आमदार आलमच्या ‘पुढारी’ ब्रॅण्डचे खादीचे कपडे परिधान करतात.मराठवाड्यातील दुष्काळी भागातल्या बीड जिल्ह्यामधील ऊसतोड कामगाराचा तो विशीतला पोरगा
. गरिबीला कंटाळून आजीच्या बटव्यातले ५०० रुपये घेतो आणि थेट मुंबई गाठतो. ओळखीचं कोणीच नसल्याने फूटपाथवर झोपतो. खिशातले पैसे संपल्यावर ना पोटाला अन्न ना अंघोळीला पाणी, अशी अवस्था. मात्र, आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग त्याच्या आयुष्यात घडतो. समयसूचकता आणि निरीक्षण शक्ती यामुळे दैवालासुद्धा त्याच्या बाजूने यावं लागतं आणि मरीन ड्राईव्हच्या फूटपाथवर झोपणारा हा मुलगा कापड दुकानाचा मालक होतो. निव्वळ पुढार्‍यांना पांढरे खादीचे कपडे विकणारा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होतो. ही ‘फिल्मी स्टाईल’ची कथा आहे बीडच्या आलम शेखची. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘पुढारी’ नावाचा कपड्यांचा ब्रॅण्ड प्रस्थापित करणार्‍या आणि ‘आलम पुढारी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या तरुणाची...


मराठवाड्यातलं बीडच्या पाटोदा तालुक्यातलं चिखली
(नाथ) हे एक छोटंसं खेडं. याच खेड्यात बशीर भिक्कन शेख, आपली आई, पत्नी शहाजानबी, मुलगा आलम आणि ४ मुलींसह राहत होता. बशीर आणि शहाजानबी ऊसतोड कामगार होते. हे शेख दाम्पत्य प्रचंड मेहनती. ऊस तोडून जो रोजगार मिळायचा त्यातून आपल्या कुटुंबाचं कसंबसं पोट भरत होते. आलमचं प्राथमिक शिक्षण चिखली (नाथ) मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. आठवी ते दहावी चिखली (नाथ) मध्ये गहिणीनाथ विद्यालयात तो शिकला. पाटोद्याच्या मूगगावातल्या आर अॅण्ड डी कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाला. सध्या तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, कुसळंब येथे विज्ञान शाखेतून पदवीच्या तिसर्‍या वर्गात शिकत आहे.लहानपणापासून आलम तसा हुशार
. ‘स्ट्रीट स्मार्टनेस’ असलेला. आपल्या अम्मी-अब्बाला ऊस तोडताना पाहून कळवळणारा. आपणही घरासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही तळमळ उराशी होती. त्यात मित्रमंडळींमध्ये मुंबईची, इथल्या नोकरीची, छानछोकी आयुष्याची चर्चा असायची. आपण मुंबईलाच गेलो तर... खूप पैसे कमावू. अम्मी-अब्बाला दुसर्‍याच्या शेतात राबायची गरज भासणार नाही. पण, मुंबईला जाणार कसं, हा यक्षप्रश्न होताच. अम्मी-अब्बाकडे तर पैसे नसणार आणि असलेच तरी मुंबईला जाण्यासाठी त्यांनी कधीच दिले नसते. मित्रांपैकी कोणी आपल्याला देईल, असं पण कोणी नाही. करायचं काय? या विवंचनेत असताना आजीचा बटवा त्याला दिसला. आजीने जपून ठेवलेले पाचशे रुपये त्याने घेतले. सरळ मुंबईची ट्रेन पकडली, ती सुद्धा तिकिटाविना आणि २६ डिसेंबर २०१६ ला सीएसटीला उतरला. दोन दिवसांच्या खाण्यापिण्यातच खिशातले पैसे संपले.आलमला पुढार्
यांचं लहानपणापासून आकर्षण. मंत्रालय परिसरात त्यांना तो पाहायचा आणि नंतर मरीन ड्राईव्ह समुद्रकिनार्‍याच्या परिसरात हिंडायचा. मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर दरदिवशी एक तरी केक कापला जायचा. मात्र, एकेदिवशी खूप केक कापले गेले. एवढे केक आज का कापले, याचं कारण त्याने एकाला विचारलं. “आज थर्टीफर्स्ट है ना.” मतलब? खेड्यातल्या आलमला ते कळलं नाही. “अरे कल से नया साल चालू होगा. इसलिये ये सेलिब्रेशन हो रहा है.” समोरच्याने सांगितलं. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर तो सुलभ शौचालयात अंघोळीला गेला. मात्र, खिशातले पैसे संपले होते. अंघोळीसाठी पाच रुपये पण नव्हते. काय करायचं असा गळ्याशी हात लावून विचार करत असताना हाताला गळ्यातलं सोन्याचं लॉकेट लागलं. त्याच्या अम्मी-अब्बूने बनवलेलं.त्याने ते लॉकेट विकलं
. ३४०० रुपये त्यातून मिळाले. मस्त अंघोळ केली. पोटभर खाऊन घेतलं. नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून मस्त खादीचा पँट शर्ट घालून चकाचक पुढार्‍यासारखा बनून मंत्रालय परिसरात तो फिरू लागला. तेवढ्यात एकजण तिथे आले. त्यांनी आलमला हे कपडे कुठून आणले असं विचारलं. त्या व्यक्तीला हे कपडे मित्रासाठी हवे होते आणि ते पण तातडीने. काही सेकंदातच आलम बोलला की, “हे कपडे आम्ही आणून विकतो.” दुकान कुठे आहे विचारल्यानंतर म्हणाला, “आमचा कारभार मोबाईलवरून चालतो.” त्या व्यक्तीने एका ड्रेसची ऑर्डर दिली. पैसे आगाऊ द्यावे लागतील. त्या व्यक्तीने थोडा विचार केला. ओठावरचं मिसरूड न फुटलेल्या त्या मुलाचा आत्मविश्वास पाहून त्याने आलमला पैसेही दिले. काही वेळात कपडे घेऊन आलम आला. ती व्यक्ती खुश झाली. तो व्यक्ती एका राष्ट्रीय पक्षाचा आमदार होता. आलमचा प्रामाणिकपणा त्यांना भावला. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून आलमने त्यांना त्यांच्या वर्तुळातील अन्य मित्रांना आलमकडून कपडे घेण्याविषयीची शिफारस करण्याची विनंती केली. मोठ्या दिलाने त्या आमदाराने काही मित्रांचे संदर्भ आलमला दिले. १ जानेवारी, २०१७ रोजी आलमने एका दिवसात ९ ते १० हजार रुपये निव्वळ खादीचे पांढरे कपडे विकून मिळवले.या पैशातून त्याने मंत्रालयाबाहेर कपडे विकण्यास सुरुवात केली
. अनेक आमदार त्याच्याकडूनच खादीचे कपडे खरेदी करू लागले. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार बाबाजानी दुर्राणी, तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुरेश धस अशा सर्वपक्षीय आमदारांनी आलमला खूप मदत केली. ७० ते ८० सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्यामुळेच आलमचा ‘आलम पुढारी’ झाला. ‘पुढारी’ नावाने त्याने स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. एका वर्षाच्या आत आमदार निवास येथील पुढारी वस्त्रभांडाराचा तो मालक झाला. विधानसभा आणि विधान परिषदेचे असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यातील अंदाजे ६६ महिला आमदार आणि ५० इतर आमदार सोडून उरलेले आमदार आलमच्या ‘पुढारी’ ब्रॅण्डचे खादीचे कपडे परिधान करतात. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘पुढारी वस्त्रभांडार’ सुरू करून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा आलमचा मानस आहे. एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ते एका वस्त्रभांडार साखळीचा मालक हा आलमचा प्रवास कोणत्याही भारतीय ग्रामीण तरुणास प्रेरणादायी आहे.

८१०८१०५२३२