दोन हजारच्या नोटा बंद होणार?

    28-Feb-2020
Total Views | 113
note_1  H x W:


‘या’ बँकेच्या एटीममधून २००० हजाराच्या नोटा होणार गायब
मुंबई : इंडियन बँकेने आपल्या एटीएममधून २००० रुपयांच्या नोटा पुरवणे बंद करून त्याऐवजी कमी मूल्याच्या नोटा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर काही दिवसांपासून बाजारातून पूर्णतः २००० च्या नोटा बंद केल्या जाणार अशा चर्चा होत्या. मात्र यावर आता स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण देत, केंद्र सरकार तर्फे बँकांना असे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याचे सांगितले.

दोन हजार रुपयांच्या नोटांचे सुट्टे करणे खूपच अवघड जाते. केवळ एवढ्याच कामासाठी लोक बँकेत गर्दी करतात त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या कमी करण्यात येणार असल्याचे म्हंटले जात होते. २००० रुपयांच्या नोटांची एटीएम मधील जागा आता कमी होण्यास सुरुवात झाली असून, त्याजागी १०० आणि २०० रुपयांच्या नोटा भरण्यात येत आहेत अशाही चर्चा होत्या मात्र या सर्व मुद्द्यांना सीतारामन यांनी पूर्णविराम दिला आहे.

वास्तविक गेल्या वर्षी एका आरटीआयच्या प्रश्नावर उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन २००० रुपये मूल्याच्या नोटांचे व्यवहारातील प्रमाण कमी होत असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यानंतर इंडियन बँकेच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा २००० च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा होत्या.

दरम्यान, सार्वजनिक बँक क्षेत्रातील इंडियन बँकेने आपल्या ४०,००० एटीएममध्ये २००० रुपयांच्या नोटा टाकणे बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले आले आहे. हा संस्थेचा निर्णय असून या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ मार्चपासून करण्यात येणार आहे. इंडियन बँकेच्या एटीएममध्ये २००० रुपयांऐवजी आता १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121