ट्रम्प यांच्या भारत भेटीचा भविष्यात फायदाच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
modi trump_1  H



पंतप्रधान मोदींनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत


मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौरा सोमवारपासून सुरू झाला आहे. या दौऱ्यात होणाऱ्या करारांतून दोन्ही देशांमधील संरक्षण आणि सामरिक संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका, जावई जेअर्ड कुश्नेर यांच्यासह त्यांच्या सरकारीमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर, अहमदाबादमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा क्रिकेट या स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. एकमेकांचा हात हातात घेत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अभिवादन केले. यावेळी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत आहे असे म्हटले. तर विविधतेतील एकता हेच भारताचे वैशिष्ट्य असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ट्रम्प यांचा हा भारत दौरा अमेरिका आणि भारत संबंधांसाठी नवा अध्याय सुरु करेल असेही ते यावेळी म्हणाले.


या दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे सहकुटुंब भारतात दाखल झाले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबाचे स्वागत करत, मेलेनिया ट्रम्प यांची उपस्थिती आमच्यासाठी सर्वात मोठा सन्मान असल्याचे ते म्हणाले. ट्रम्प यांची कन्या इवांका यांनी मागच्या दौऱ्यात पुन्हा भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यावर आज पुन्हा एकदा तुमचे भारतात स्वागत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.


दोन देशांतील संबंधांमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो. दिवसेंदिवस भारत आणि अमेरिकेमधला विश्वास वाढत आहे. व्यापार, संरक्षण, संशोधन, सांस्कृतिक संबंध अशा सगळ्याच क्षेत्रात भारत अमेरिकेचे संबंध वाढत असून, मोठी उद्दिष्टे ठेवून ती प्राप्त करणे हे नव्या भारताचे लक्ष्य आहे. डोनाल्ड ट्रम्प हे विलक्षण नेते असून भारताचे मित्र आहेत, त्यांच्या भारत भेटीचा भविष्यात फायदा होईल. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीमुळे भारत-अमेरिका संबंध एका नव्या उंचीवर पोहचल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ट्रम्प हे अहमदाबादच्या रोड शोनंतर दिल्लीला जाऊन ताजमहालाला भेट देणार आहेत.


@@AUTHORINFO_V1@@