वातावरणातील बदल आणि स्ट्रोकचा धोका

    दिनांक  13-Jan-2020 21:16:06
|
PAGE 8 _1  H xतापमानामधील १० अंशांहून अधिक बदलामुळे स्ट्रोकचा धोका १२ ते १८ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. तेव्हा, स्ट्रोक म्हणजे काय? त्याची लक्षणे आणि उपाययोजना या विषयांवर प्रकाश टाकणारा हा लेख...

 
 

'स्ट्रोक' ही प्रमुख जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्याच म्हणून उदयास आली आहे. 'ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी'नुसार 'स्ट्रोक' हा जगभरातील मृत्यूंसाठी दुसरा गंभीर आजार ठरला आहे. भारतात गेल्या दशकभरामध्ये सहा आजार चिंतेचे विषय बनले आहेत. १९७०-८०च्या दशकाच्या तुलनेत या दशकामध्ये स्ट्रोकच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. 'ब्रेन अटॅक' म्हणून ओळखला जाणारा 'अ‍ॅक्यूट इस्केमिक स्ट्रोक'हा वैद्यकीय आपत्कालीन आजार आहे. अपंगत्व व मृत्यूला अटकाव करण्यासाठी या आजारावर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे आहे.

 

मेंदूला ऑक्सिजनयुक्तच रक्ताचा पुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण झाल्याने 'ब्रेन अटॅक' येतो. वेळेवर या आजाराचा उपचार झाला नाही, तर मेंदूतील पेशींचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते आणि मेंदूवर परिणाम केलेल्या घटकांच्या आधारावर अपंगत्व किंवा मृत्यू ओढवू शकतो. 'अ‍ॅक्यूट स्ट्रोक'ची चिन्हे व लक्षणांचे लवकर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. 'अ‍ॅक्यूट इस्केमिक स्ट्रोक'वर नियंत्रण ठेवणे हे काळासोबत शर्यतीसारखे आहे. येथे वेळ हा मेंदू आहे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, एका मिनिटाच्या विलंबामुळेदेखील १.९ दशलक्ष मज्जातंतू निकामी होतात. सुरुवातीचा उपचार करण्यासाठी जितका अधिक वेळ लागेल तितका मेंदूमधील पेशींचे अधिक नुकसान होऊ शकते.

 

चला, वातावरणीय संबंधित स्ट्रोकबाबत उत्तमप्रकारे जाणून घेऊया. नुकतेच करण्यात आलेल्याअभ्यासांमधून हिवाळा ऋतू आणि स्ट्रोकच्या वाढत्या प्रमाणामध्ये परस्पर संबंध आढळून आला आहे. थंड वातावरणामध्ये रक्तवाहिन्या संकुचित होतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. तसेच थंड वातावरणादरम्यारन रक्त जाड व चिकट होते, ज्यामुळे सहजपणे रक्ताच्या गाठी निर्माण होतात. तापमानामधील १० अंशांहून अधिक बदलामुळे स्ट्रोकचा धोका १२ ते १८ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे उष्ण व दमट वातावरणामुळेदेखील डीहायड्रेशन होते आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. म्हणून तापमानामध्ये बदल जाणवल्यास स्ट्रोकचा धोका असलेले कुटुंबातील सदस्य व मित्रांची अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.PAGE 8 _1  H x

 

स्ट्रोकची लक्षणे

ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. रुग्णाला स्वत:ला किंवा कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना आजाराची लक्षणे समजू शकतात. उत्तमरित्या व मान्य असलेले 'मेमोनिक फास्ट'चा (एफएएसटी) उपयोग करत आजाराची लक्षणे समजू शकतात.

 

या 'मेमोनिक'चा अर्थ :

 

एफ : चेहरा गळून पडणे. चेहरा समान दिसणार नाही किंवा चेहर्‍याच्या एका बाजूला झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. व्यक्ती हसण्याचा प्रयत्न करते, तेव्हा हा बदल अधिक प्रमाणात दिसून येतो.

 

: हातामध्ये अशक्तपणा. रुग्ण दोन्ही हात वर करेल, त्यावेळी परिणाम झालेला हात आपोआपपणे खाली पडेल.

 

एस : बोलताना अडखळणे. बोलताना त्रास होतो किंवा स्पष्टपणे बोलता येत नाही किंवा अस्पष्ट उच्चार येतात.

 

टी : वेळ. वैद्यकीय मदत घेण्याची वेळ. स्ट्रोकची इतर लक्षणे, ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 

- शरीराची एक बाजू किंवा अवयव सुन्न पडणे किंवा हालचाल न जाणवणे.

- गोंधळ उडणे किंवा विकृती येणे किंवा अवास्तव बोलत राहणे.

- अचानक डोळ्यांच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला दृष्टी कमी होणे.

- चालताना अचानक भोवळ येणे किंवा संतुलन जाणे.

- त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज

 

स्ट्रोक असल्याचे निदान झाल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावा. रुग्णाला त्वरित स्ट्रोकसाठी उपचार उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलच्या व आपत्कालीन विभागामध्येे घेऊन जावे. रक्ताच्या गाठींमुळे रक्तापुरवठ्यामध्ये झालेला अडथळा त्वरित दूर करावा. सामान्यत: लक्षणे जाणवल्याच्या तीन तासांमध्ये हा अडथळा दूर केला पाहिजे. आपत्कालीन विभागामध्ये गाठी दूर करणारे इंजेक्शन दिले जाते. काही विशिष्ट केसेसमध्ये हे इंजेक्शन ४.५ तासांपर्यंत देता येऊ शकते. म्हणून स्ट्रोकची लक्षणे जाणवल्यानंतर तीन तासांमध्ये स्ट्रोकसाठी उपचार असलेल्या चार हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागामध्ये येणे आवश्यक आहे.

 

प्रतिबंधात्मक उपाय

- धूम्रपान सोडा : धूम्रपान प्राणघातक आहे.

- आरोग्यादायी आहाराचे सेवन करा आणि जंक फूड, रेडिमेड व मीठयुक्तच आहार टाळा.

- फळे व पालेभाज्यांचे सेवन वाढवा.

- शरीराचे योग्य वजन ठेवा आणि बीएमआय २५ पेक्षा कमी असावा.

- नियमितपणे शारीरिक व्यायाम करा, म्हणजे आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करा.

- रक्तातील कोलेस्टेरॉल पातळीवर नियंत्रण ठेवा.

- रक्तादाब १२०/८० मिमीऐवजी पर्यंतच्या सामान्य पातळीपर्यंत ठेवा.

- मधुमेहावर नियंत्रण ठेवा.


- डॉ. संदीप गोरे

(लेखक मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या आपत्कालीन चिकित्सा विभागाचे प्रमुख आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.