अभाविपमुळे २७० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार

    दिनांक  11-May-2019


 

विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभाविपने केला होता पाठपुरवठा


मुंबई : चर्चगेट येथील शासकीय विधी महाविद्यालयातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल परीक्षा देण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊन नये यासाठी अभाविपने पाठपुरवठा केला होता. अखेर अभाविपच्या पाठपुरवठ्याची दाखल घेत शासकीय विधी महाविद्यालयाने नापास झालेल्या २७० विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचे मान्य केले.

 

मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त महाविद्यालयाने प्रॅक्टिकल परीक्षा घेणे अनिवार्य असते. जर विद्यार्थी नापास झाले तर महाविद्यालय पुन्हा एकदा परीक्षा देऊ शकतात. याच नियमाच्या आधारे १८ मे रोजी अभाविपच्या प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे व महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा केवळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी या अभाविपच्या प्रतिनिधी मंडळाने या विद्यार्थ्यांची पुनःपरीक्षा घेण्याचे निवेदन दिले होते.

 

महाविद्यालयीन प्रशासनाने पुनःपरिक्षा मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार लवकरात लवकर घ्यावी. जेणेकरून २७० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. आम्ही विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होइपर्यंत त्यांच्यासोबत आहोत, असे अभाविप मुंबई महानगर मंत्री अमेय महाडिक यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat