'जेट' पुन्हा उड्डाण घेईल का ?

    दिनांक  31-Dec-2019 16:25:42
|
JET _1  H x W:
 

हिंदूजा समुह लिलावात सहभागी होणार 

नवी दिल्ली : ब्रिटनचा हिंदूजा समुह बंद पडलेल्या जेट एअरवेज विमान कंपनीला खरेदी करण्यासाठीच्या लिलावात सहभाग घेणार आहे. या समुहाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अशोक हिंदूजा आणि गोपीचंद हिंदूजा या बंधूंनी याबद्दल तयारी सुरू केली आहे. लिलावात सहभाग घेण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी असणार आहे. जेटमधील सुत्रांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. यापूर्वी सिनर्जी समुहाने विमानकंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

कंपनीच्या ठेवीदारांनी जेट एअरवेजचा लिलाव नव्याने करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅंकेचे ८ हजार २३० कोटींचे कर्ज आहे. कर्मचारी आणि अन्य थकबाकीदारांना एकूण ६ हजार ४०० कोटी देय रक्कम थकीत आहे. जेटच्या एकूण समभागांपैकी २४ टक्के हिस्सा अबुधाबीच्या एतिहाद एअरवेजचा आहे. गोपिचंद हिंदूजा यांनी एका मुलाखतीत जेट एअरवेज खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. हिंदूजासह अन्य कंपन्यांनीही बोली लावण्याची तयारी दर्शवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, जेट एअरवेजच्या लिलावत कंपनीचे मुल्य हे हिंदूजा समुहाची अडचण ठरणार आहे. हिथ्रो हवाई अड्डा, लॅण्डींगचे अधिकार आणि उड्डाणातील अन्य जागांच्या वैधतेचाही मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB अॅप.