डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

    दिनांक  17-Apr-2018बुलडाणा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक समता सप्ताहाचे काल समारोप करण्यात आला. जिल्ह्याच्या सामाजिक न्याय भवनामध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात या सप्ताहाचे समापन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्यासह अनेक मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.
काल सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मलकापूर रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी दुबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी पोलीस बँडच्यावतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सामाजिक सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये वसतिगृहातील विद्यार्थीनींनी गीत गायन सादर केले. तसेच काही विद्यार्थीनींनी भाषणांद्वारे आपले मत मांडले. यावेळी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार पात्र विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.