"...तुम्हाला नग्न अवस्थेत परेड करण्यास भाग पाडेन", रेवंत रेड्डीची महिला पत्रकारांप्रती अर्वाच्च भाषा
16-Mar-2025
Total Views | 33
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंती रेड्डी (Revanth Reddy) पत्रकारांप्रती खालच्या भाषेचा वापर करत त्यांचा अनादर करत आहेत. समाज माध्यमांवर काही पत्रकारांनी रेवंती रेड्डी यांना धारेवर धरले. त्यावरून आता रेवंती रेड्डी यांचा तिळपापड झाल्याने त्यांनी पत्रकारांना खालच्या भाषेचा दर्जा दाखवला आहे. जर अशा टीका टीप्पणी केल्यास तुम्हाला नग्न अवस्थेत परेड करण्यास सांगेन. टीका करणे हा एक भाग असतो पण कौटुंबिक अपमान सहन करणार नाही.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर त्यांनी अभार प्रस्तावावर विधानसभेतील सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ऑनलाइन मोहिम थांबवण्यासाठी कायदा निर्माण केला जाऊ शकतो. पत्रकार कोण आहेत याचे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली असल्याचं ते म्हणाले.
So now Telangana CM Revanth Reddy threatens to strip and publicly parade critics who post against him?
Is this how fragile leaders handle criticism now? Shameful attack on free speech.
Authoritarianism is alive and kicking in Telangana.
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) March 16, 2025
मुख्यमंत्री रेड्डी यांनी बोलताना स्पष्ट केले की. सोशल मीडियाचा विपर्यास कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा असतो. त्यानंतर ते म्हणाले की, आम्ही सार्वजनिक जीवनात आहोत आणि टीकेसाठी तयार आहोत, परंतु आमच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले असून हा अन्याय आहे. पत्रकारितेच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
यामुळे आता दोन महिला पत्रकारांवर अक्षेपार्ह कंकेट समाजमाध्यमांवर शेअर करण्यात आल्याचा आरोप आहे. पल्स या एका प्रसारमाध्यमाच्या रेवची पोगदंडा आणि संध्या उर्फ तन्वी यादव या दोन महिला पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारत राष्ट्र समितीच्या कार्यलयाचा व्हिडिओ शूट केल्याचा आणि मुख्यमंत्र्यांविरोधात कंटेट प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला. यावर आता बीरआरएस नेत्यांनी टीका केली की, विरोधकांना दडपवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.