दिल्लीत भाजपच्या विजयानंतर नरेंद्र मोदींकडून विकासाची गॅरंटी

नरेंद्र मोदींनी मानले दिल्लीकरांचे आभार

    08-Feb-2025
Total Views | 18

Narendra Modi
नवी दिल्ली (Narendra Modi) : दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पक्ष आणि त्यांचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. त्याचबरोबर भाजपच्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले असून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
दिल्लीचे निकाल हाती आल्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, “लोकांची शक्ती ही सर्वोपरी आहे. विकासाचा आज विजय झाला. सुशासन विजयी झाले. भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर दिल्लीतील बंधू भगिनींना माझा सलमा आणि अभिनंदन! तुम्ही दिलेल्या उदंड आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
 
 
 
यावेळी त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये नमूद करताना लिहिले की, आम्ही दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि दिल्लीकरांचे जीवनात समृद्ध करण्यासाठी विकसित भारताच्या उभारणीसाठी दिल्लीच्या महत्त्वाच्या भूमिकेबाबत खात्री करण्यात येईल. मला आमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. ज्यांनी या जबरदस्त जनादेशासाठी रात्रंदिवस काम करण्यात आले. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांच्या सेवेसाठी आणखी सदैव तत्पर राहू, असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121