Chhaava Worldwide Box Office Day 12: छावा चित्रपटाचा तुफान गडगडाट १२ दिवसांत ५०० कोटींच्या उंबरठ्यावर!

    26-Feb-2025
Total Views | 63





CHAAVA BOX OFFICE COLLECTION DAY 12
 
 
 
 
मुंबई : मराठा राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि मुघल सम्राट औरंगजेबाविरुद्धच्या त्यांच्या संघर्षाचे चित्रण करणारा 'छावा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. लक्षणीय म्हणजे, या चित्रपटाने मंगळवारी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल ३५० कोटींचा टप्पा ओलांडला, तर जागतिक स्तरावर पहिल्या १२ दिवसांत ५०० कोटींच्या जवळ पोहोचला आहे.
 
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात विशेष उल्लेख केला होता, यामुळे या चित्रपटाची चर्चा अधिक रंगली आहे. सकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने १२व्या दिवशी एकूण ७० कोटींची कमाई केली असून, भारतात आतापर्यंत ४१३.३५ कोटींची कमाई झाली आहे.
 
छावा बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १२:

मंगळवारी, १२व्या दिवशी या चित्रपटाने ₹१८ कोटींची कमाई केली असून, त्याची भारतातील एकूण कमाई आता ३६३.२५ कोटींवर पोहोचली आहे. जागतिक पातळीवर या चित्रपटाने ४८३.३५ कोटींची कमाई केली आहे. आगामी महाशिवरात्रीच्या सुट्टीचा फायदा घेत हा चित्रपट लवकरच ५०० कोटींचा मैलाचा दगड पार करेल, असा अंदाज आहे.
 
विशेष म्हणजे, सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला कोणतीही मोठी स्पर्धा नाही. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि आगामी सुट्ट्यांचा विचार करता "छावा" अजून मोठी कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
प्राणवायूचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘हिरवांकुर फाऊंडेशन’

प्राणवायूचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘हिरवांकुर फाऊंडेशन’

संपूर्ण विश्वात प्राणवायू हा फक्त आणि फक्त वृक्षच निर्माण करतात आणि म्हणून आपण त्याचे महत्त्व जाणले पाहिजे. हे महत्त्व जाणण्यासाठी आणि दुसर्‍यांना सांगण्यासाठी निलयबाबू शाह जैन यांनी ‘हिरवांकुर फाऊंडेशन’ची स्थापना केली. प्रथमतः त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांनी या कार्यात सामील केले. त्यानंतर या कार्याचे महत्त्व त्यांनी मित्र, नातेवाईक, विद्यार्थी, शिक्षक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांना पटवून दिले. पाहता पाहता ‘हिरवांकुर’च्या छताखाली उभी राहिली पर्यावरणप्रेमींची एक सुंदर, मजबूत व भव्य साखळी. या लेखाद्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121