शीशमहलचे होणार संग्रहालय - दिल्ली मुख्यमंत्री रेखा गुप्ता

    20-Feb-2025
Total Views | 29
 
Rekha Gupta
 
नवी दिल्ली : दिल्लीच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी दि: २० फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. दिल्लीच्या रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर आता रेखा गुप्ता यांनी महिलांसाठी निवडणुकीआधी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी महिलांना प्रतिमहिना २५०० रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. अशातच त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या व्यतिरिक्त रेखा गुप्ता यांनी शीशमहलाबाबतही मोठं वक्तव्य केले आहे.
 
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, २५०० रुपये पहिला हप्ता आठ मार्चपर्यंत दिल्ली महिलांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकार करायचा असेल तर भाजपच्या सर्वच ४८ आमदारांकडे याची जबाबदारी आहे. मतदारांना देण्यात आलेले सर्वच वचन हे पूर्ण करुया, ज्यात महिलांना देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाचाही त्यात समावेश आहे.
 
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अरविंद केजरीवाल यांनी शीशमहालमध्ये रुपांतरित केलेल्या सरकारी निवासस्थानी राहण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की, अरविंद केजरीवाल यांनी बांधलेल्या शीशमहालात राहणार नाही. त्यांचे संग्रहालयात रुपांतर होणार आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
 
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांचा सहभाग अल्लेखनीय होता. महिला मतदारांनी मतदानादरम्यान अधिक उत्साह दाखवला. आकडेवारीनुसार, महिला मतदारांनी ६०.९२ % होते. तर पुरुषांचे मतदान हे ६०. २१ % होते. या व्यतिरिक्त महिलांनी ४० विधानसभा मतदारसंघात पुरूषांच्या तुलनेत अधिक मतदान केले आहे. त्यापैकी महिलांनी मतदान केलेल्यांपैकी सर्वाधिक २९ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121