ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे ही संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्राची नैतिक जबाबदारी!

बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक विद्याधर अनास्कर यांचे प्रतिपादन

    16-Feb-2025
Total Views | 132

vidyadhar anaskar 1
 
मुंबई : न्यु इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थीक घोटाळ्यामुळे शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत न्यु इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर बंदी आणली आहे. १२२ कोटींच्या घोटाळ्यात बँकेचे जनरल मॅनेजर हितेश मेहता यांना १५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दल विविध स्तरांमधून प्रतिक्रीया उमटत असताना, बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, अभ्यासक विद्याधर अनास्कर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. सदर प्रकरणावर भाष्य करताना ते म्हणाले की "संपूर्ण भारतभर `आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष' साजरे होत असतांना, मुंबई येथील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्याची घटना दुर्दैवी आहे.`सहकार से समृध्दी' हा नारा देत सहकाराचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालय मनापासून प्रयत्न करत असतानाच घडणाऱ्या या अशा घटनांमुळेच सहकारी बँकिंग क्षेत्रावरील विश्वास ढासळताना दिसून येतो. सहकाराअंतर्गत सहकार' 'Co-operation amongst Co-operative' हे सहकारात प्रमुख तत्व मानले गेले आहे. त्यानुसार आपापसात सहकार्याची भावना असण्याची गरज प्रतिपादन केली जात आहे.या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला मुंबईस्थित इतर सहकारी बँकांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. त्यासाठी सहकारी बँकांचे असोसिएशन आणि फेडरेशन यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन विद्याधर अनास्कर यांनी केले.

काही वर्षांपूर्वी रत्नाकर गायकवाड सहकार आयुक्त असताना रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने पुण्यातील सर्व बँकांनी अडचणीतील एका नागरी सहकारी बँकेत सुमारे १४० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या, तर सायबर हल्ल्यामध्ये मोठे नुकसान सोसाव्या लागलेल्या बँकेमधून भितीपोटी कोणतीही रक्कम न काढण्याचा एकत्रित निर्णय पुण्यातील सहकारी बँकांनी घेत `सहकाराअंतर्गत सहकार' या तत्वाचे दर्शन घडविले होते.त्याचपध्दतीने मुंबईस्थित सक्षम नागरी सहकारी बँकांनी अडचणीतील बँकांमधील थकीत कर्जे वाटून घेतल्यास अथवा नवीन व्यवसायासाठी कर्जपुरवठा केल्यास, अडचणीतील बँक पूर्णपदावर आणण्याचे श्रेय सहकारी बँकिंग क्षेत्राला मिळेल व `सहकाराअंतर्गत सहकार' या तत्वाचा प्रत्यक्ष पुरस्कार करुन आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार क्षेत्राला योग्य दिशा मिळेल.

यासाठी सक्षम सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत अडचणीत असलेल्या बॅंकेच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करुन रिझर्व्ह बॅंकेस देणे आवश्यक आहे. तसेच शासन अथवा रिझर्व्ह बॅंकेने या सक्षम सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या प्रशासक मंडळाची नेमणूक केली पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी ठेवीदारांनी संयम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. सहकार क्षेत्राने मनात आणले तर अशक्य काही नाही.कोणतीही बँक एका दिवसात अडचणीत येत नाही. रिझर्व्ह बँक अडचणीतील सहकारी बँकांना ३ ते ४ वर्षाचा कालावधी निश्चितच देते. बँका अडचणीत येण्याची कारणे, तेथील गैरव्यवहाराबद्दल स्थानिक सहकार क्षेत्राला याची संपूर्ण माहिती असुनही, कुणी त्याबद्दल बोलत नाही, संबंधितांची कान उघडणी करत नाही, वेळीच त्यांना आवश्यक ती मदत अथवा सल्ला देत नाही, ही देखील सहकार क्षेत्राशी या क्षेत्रातील इतरांनी केलेली प्रतारणाच ठरावी.



अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121