दिल्ली मेट्रो स्थानकात 'खारघर'सदृश परिस्थिती!

    15-Feb-2025
Total Views |

Delhi Metro Station

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Delhi Metro Station)
दिल्ली मेट्रो स्थानकातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये काही इस्लामिक तरुणांचा एक जमाव मेट्रो स्थानकावर गोंधळ घालताना दिसतोय. टोकन किंवा मेट्रो कार्डचा वापर न करता हे तरूण बिनधास्तपणे उडी मारून गेट ओलांडताना दिसतायत. त्यांच्या सुरु असलेला हा उन्माद पाहून सोशल मिडियावर विविध प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. तरी या प्रकरणी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक निवेदन जारी केले आहे.

हे वाचलंत का? : समतेचे आणि समरसतेचे प्रतीक 'महाकुंभ' : ओम बिरला



निवेदनाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना दि. १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मॅजेंटा लाइनवरील जामा मशीद मेट्रो स्टेशनवर घडली. शब-ए-बरातच्या रात्री काही प्रवाशांनी एएफसी गेटवरून उडी मारून बाहेर पडल्यामुळे काही काळ प्रवाशांची तात्पुरती गर्दी झाली होती. त्यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपस्थित होते. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली नाही. एकाच वेळी दोन गाड्या स्टेशनवर आल्या, त्यामुळे गर्दी वाढली आणि एक्झिट गेटवर जमा झाली. एक्झिट गेटवर दबाव वाढल्याने तात्पुरते काम करणे थांबले.

पुढे निवेदनात असेही म्हटले आहे की, 'या परिस्थितीत प्रवाशांना जवळच्याच गेटमधून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, काही प्रवाशांनी घाईघाईने एएफसी गेटमधून उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर स्थानकावर पूर्ववत स्थिती निर्माण झाली. कोणतीही अराजकता किंवा हिंसाचार त्याठिकाणी घडला नाही.'
अग्रलेख
जरुर वाचा
जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी

जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी 'हरित ऊर्जा' प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जनतेला स्वस्त दरात आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची मजबुती आणि हरित ऊर्जेचा व्यापक विस्तार हे आगामी काळातील केंद्रबिंदू असतील. यासाठी ऊर्जा विभागाने नियोजनबद्ध आणि कालबद्ध स्वरूपात प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121